शून्यवर आऊट होताच जेवायला पोहोचला आंद्रे रसेल


मुंबई : कोलकाता विरुद्ध दिल्ली अटीतटीचा सामना झाला. या सामन्यात दिल्लीने 4 विकेट्सनं कोलकाताचा पराभव केला. गुरुवारी झालेल्या सामन्यात स्टार ऑलराऊंडर खेळाडू आपल्या फ्लॉप शोसोबत आणखी एका गोष्टीसाठी सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. 

कोलकाताचा स्टार प्लेअर आंद्रे रसेल आधीच गेल्या काही सामन्यात फ्लॉप ठरला. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात शून्यवर आऊट झाल्यानंतर तो थेट जेवायला पोहोचला. कोलकाता टीमला हा सामना गमवल्यानं पॉईंट टेबलवर मोठा फटका बसला आहे. 

आंद्रे रसेलचं खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. रसेल शून्यवर आऊट झाल्यानं आणि त्याचसोबत जेवायला पोहोचल्यानं त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. युजर्स आणि क्रिकेटप्रेमींनी त्याची खिल्ली उडवली. रसेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

एक युजर म्हणाला आहे की रसेलला सगळ्यांनी सांगितलं असावं की उशिरा आलास तर जेवण संपेल. त्यामुळे लवकर आऊट होऊन रसेल जेवायला पोहोचला. दुसऱ्या युजरने म्हटलं की खेळापेक्षा जेवण जास्त महत्त्वाचं होतं. 

आंद्रे रसेलची आयपीएल 2022 मधील कामगिरी खास राहिली नाही. आंद्रे रसेलने IPL 2022 च्या 9 सामन्यांमध्ये केवळ 227 धावा केल्या आहेत. आंद्रे रसेल गेल्या 10 हंगामात आयपीएल खेळत आहे आणि त्याने 30.11 च्या सरासरीने आणि 178.26 च्या स्ट्राइक रेटने 1927 धावा केल्या आहेत. आंद्रे रसेलने आयपीएलमध्ये 82 विकेट घेतल्या आहेत.Source link

Leave a Reply