धक्कादायक! Ranveer Singh ‘फूड’ कोमामध्ये, नक्की काय घडलं जाणून घ्या


मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग फूड कोमामध्ये गेला असल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही बातमी स्वत: रणवीर सिंगच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर देखील एकच चर्चा रंगली आहे. रणवीर सध्या न्युयॉर्कमध्ये होता. तेथे तो एका प्रोजेक्ट दरम्यान गेला असताना त्याच्यासोबत ही घटना घडली. या घटनेपूर्वीचा आणि नंतरचा फोटो देखील रणवीरच्या अकाउंटमधून शेअर करण्यात आले आहे.

आपल्या सोशल मीडियावर रणवीरने स्वादिष्ट जेवणाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यामधील पहिल्या फोटो रेस्टॉरंटच्या बाहेर उभा असलेला रणवीरचा आहे, दुसऱ्या फोटोत तो टॅको खाताना दिसत आहे आणि येथेच हे सगळं खात असताना रणवीर फुड कोमामध्ये गेला आहे.

हनी-बटर टोस्ट, हाफ बेक्ड मार्शमॅलो, कुकी विथ प्रेटझेल्स आणि कुकी क्रंब्स, सॉफ्ट चीजकेक, रास्पबेरी सॉर्बेट, पफ पेस्ट्री असे अनेक गोड पदार्थ रणवीर खात असतानाचा फोटो शेअर केला आहे. परंतु तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, रणवीर पूर्णपणे ठिक आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर गंमतीनं तो फूड कोमामध्ये गेल्याचं सांगितलं आहे.

इतकं सगळं खाल्यानंतर माणसाची काय अवस्था होणार याचा तुम्ही विचार करुच शकता. रणवीरसोबत देखील तसंच घडलं, इतके सगळे पदार्थ खाल्ल्यानंतर रणवीरला ते जेवण इतकं अंगावर आलं की तो तेथेच सोफ्यावर बसुन आपल्या पोटावर हात ठेऊन झोपला आहे. हा फोटो शेअर करत रणवीर ने लिहिलंय, ‘…आणि याचा परिणाम आहे…फूड कोमा.’

या न्यूयॉर्क ट्रिपमध्ये रणवीरसोबत फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ आहे. तसे, रणवीर आणि रोहनचे हे फोटो पाहता दोघांनी तेथे खूप एन्जॉय केल्याचे दिसते. त्याने न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर दर्जेदार वेळ घालवला आहे.

रणवीर नुकताच एनबीए ऑल स्टार सेलिब्रिटी गेममध्ये दिसला होता. खेळ पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना रणवीरला पाहून खूप आनंद झाला. रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणवीर चित्रपट 83 मध्ये दिसला होता. तसेच तो आगामी रॉकी आणि राणीची प्रेमकथा, सर्कस, जयेशभाई यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.Source link

Leave a Reply