धक्कादायक : अभिनेत्री आयशा टाकिया आणि कुंटूंबासोबत गोवा एअरपोस्टवर गैरवर्तन


मुंबई : अभिनेत्री आयेशा टाकियाचा आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र वाढदिवसापूर्वी आयशा आणि तिचा पती फरहान आझमीसोबत एक घटना घडली आहे.ज्यामुळे दोघंही खूप नाराज झाले होते. आयशा आणि फरहान आझमी दोघंही आपल्या मुलासोबत गोव्यावरुन मुंबईला परतत असताना विमानतळ अधिकाऱ्यांनी आयेशा आणि फरहानसोबत गैरवर्तन केलं. फरहानने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये फरहानने विमानतळावरील दोन अधिकाऱ्यांवर त्रास देणे आणि फिजिकल छळ केला असल्याचा आरोप केला आहे.

आयशा टाकियाचा पती फरहान आझमीने एकत्र अनेक ट्विट केले, ज्यात त्यांनी विमानतळ व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला. या ट्विटमध्ये त्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. जे विमानतळ अधिकाऱ्यांचे आहेत. या फोटोंसोबत फरहानने लिहिलं की, ‘प्रिय @CISFHQrs, मी मुंबईसाठी निघत होतो आणि माझी फ्लाईट संध्याकाळी 6.40 वाजता गोव्यातून होती. त्यादरम्यान आरपी सिंग, एके यादव आणि वरिष्ठ अधिकारी बहादूर यांनी मला माझ्या कुटुंबापासून वेगळं केलं. माझं नाव वाचून त्यांनी हे केलं.

फरहान आझमीने आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिलं की, ‘या प्रकरणाने वादाचं रूप तेव्हा धारण केलं जेव्हा सुरक्षा डेस्कवरील एका अधिकाऱ्याने माझ्या पत्नी आणि मुलाला शारीरिक स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना दुसऱ्या रांगेत उभं राहण्यास सांगितलं, तर इतर सगळी कुटुंबं एकत्र उभी होती.

एवढ्यावरच फरहानचा राग थांबला नाही. तिसऱ्या ट्विटमध्ये त्याने लिहिले की, ‘विमानतळावर  वरिष्ठ अधिकारी बहादूर यांनी मला वेगळं केलं आणि माझी झडती घेतली. त्यावेळी त्यांनी माझ्यावर आक्षेपार्ह शेरा मारला आणि माझं चेकिंगदेखील केलं. त्यावेळी माझ्या खिशात फक्त 500 रुपयांची नोट होती. फरहानने आपल्या ट्विटमध्ये मुंबई पोलीस आणि गोवा विमानतळालाही टॅग केलं आहे.

फरहान आझमीचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताच गोवा विमानतळाकडून त्याला लगेच प्रतिसाद मिळाला. गोवा विमानतळाने फरहान आझमी आणि आयेशा टाकियाची माफी मागितली आहे. त्यांनी ट्विट करून लिहिलं की, प्रवासादरम्यान झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल.Source link

Leave a Reply