Headlines

shivsena yuvasena worker dilip ghuge challenged santosh banger in hingoli



संतोष बांगर हे नाव एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या सुमारास बरंच चर्चेत आलं होतं. सुरुवातीला बंडखोर गटावर टीका करणारे संतोष बांगर नंतर स्वत:च एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे त्यांच्यावर ‘गद्दार’ अशी देखील टीका केली गेली. यानंतर काही दिवसांपूर्वीच संतोष बांगर यांचा मध्यान्न भोजन केंद्राच्या व्यवस्थापकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी त्यांच्या कोणत्या विधान किंवा कृतीसाठी नसून हिंगोलीतल्या एका युवासेना कार्यकर्त्यानं त्यांना दिलेल्या जाहीर आव्हानामुळे संतोष बांगर हे चर्चेत आले आहेत.

नेमकं काय घडलं?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करून नवा गट स्थापन करणारे शिवसेना आमदार आणि खासदार पुन्हा निवडून येणार नसल्याचा दावा शिवसेनेच्या अनेक नेतेमंडळींनी आत्तापर्यंत केला आहे. मात्र, तरीदेखील जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर आपण निवडून येऊ असा विश्वास शिंदे गटाकडून बोलून दाखवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना कार्यकर्ते दिलीप घुगे यांनी संतोष बांगर यांना खुलं आव्हान दिलं आहे.

“..मग मी भिक्षा मागून खाईन”

घुगे यांनी संतोष बांगर यांना पुन्हा निवडणुकीत जिंकून यायचं आव्हान दिलं आहे. “माझं आव्हान आहे की संतोष बांगर यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं. पण त्यांच्यात हिंमत नाही. भविष्यात जेव्हा केव्हा पुढची निवडणूक लागेल, तेव्हा त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं. जर ते निवडून आले, तर माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आणि मी कमावलेली सगळी प्रॉपर्टी मी दान करायला तयार आहे. त्यानंतर मी भिक्षा मागून खाईन”, असं घुगे म्हणाले आहेत.

आमदार संतोष बांगर यांनी मारहाण का केली? व्यवस्थापकानं दिलं स्पष्टीकरण; सर्व आरोपही फेटाळले, म्हणाले…

“..तर मुख्यमंत्र्यांना एक लाख लिटर दुधाचा अभिषेक”

दरम्यान, या भागातील खासदार देखील पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, असा दावा घुगे यांनी केला आहे. “बंडखोर गटातील खासदार जर पुन्हा निवडून आले, तर माझ्या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांकडून मी एकेक रुपया जमा करेन आणि १ लाख लिटर दुधाचा अभिषेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करेन. आत्ता सत्ता आहे. तुम्ही ती जास्त डोक्यात जाऊ देऊ नका. लोकांची विकासकामं करा. गरीबांना मदत करा एवढंच मी सांगेन”, असं घुगे म्हणाले आहेत.



Source link

Leave a Reply