Headlines

“शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत…,” संजय राठोड प्रकरणावरुन चित्रा वाघ पुन्हा संतापल्या | BJP Chitra Wagh on Shivsena Sanjay Rathod Maharashtra Cabinet Expansion rno news sgy 87

[ad_1]

शिवसेनेतील बंडखोर आमदार संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने विरोधकांकडून टीका होत असताना, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही पक्षाला घरचा आहेर दिला आहे. संजय राठोड यांच्याविरोधात आंदोलन करत राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या चित्रा वाघ यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याने नाराजी जाहीर केली आहे. दरम्यान दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं असून संजय राठोड यांनी क्लीन चीट का दिली? अशी विचारणा केली आहे. तसंच पीडित मुलीला न्याय मिळणार असेल, तर आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

संजय राठोड यांच्यावरुन होणाऱ्या टीकेसंबंधी विचारलं असता त्यांनी सांगितलं, “कोण मला चांगलं बोलत आहे, वाईट बोलत आहे याला मी कधीच महत्त्व देत नाही. माझा लढा मी लढणार आहे. मला कोणी निंदावं, कोणी वंदावं यामुळे फरक पडत नाही. ती महाराष्ट्राची मुलगी होती. त्या मुलीसाठी लढणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे”.

“संजय राठोड यांच्याविरोधात मी याचिका दाखल केली आहे, त्याच्या तारखा सुरू आहेत. कोर्टाने राज्य सरकारकडून रिपोर्टही मागवला होता. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने संजय राठोडला क्लीन चिट दिली होती. राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री, उपमुख्यंत्री, गृहमत्री, पोलीस आयुक्त यांना संजय राठोडला क्लीन चिट कशी दिली? हे विचारलं पाहिजे. पुणे पोलिसांनी ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचं सांगितलं होतं. मग आता क्लीन चीट कशी दिली? आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. जे सत्य आहे ते समोर येईल. आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे”.

चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं “सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या आहेत. आम्ही राठोड यांच्या कुटुंबाची माफी मागावी असं वाटत असेल, तर त्यांना करुणा मुंडेंची मागावी लागेल. तेवढं मोठं मन आहे का? ती महिला आपल्या हक्कासाठी आली होती. तिची धिंड टाकली, तिच्या गाडीत पिस्तूल ठेवण्यात आलं, जेलमध्ये टाकलं. त्यामुळे ठाकरे सरकारमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनीही तिचे पाय धरले पाहिजेत. आम्हाला शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडू नये”.

“मी राजीनामा दिल्याने जर त्या मुलीला न्याय मिळणार असेल तर नक्की देईन. पण जेव्हा माझा लढा सुरु होता, तेव्हा हात बांधून कुठे बसले होते. माझ्याविरोधातील एकजूट अशीच ठेवा, भविष्यात तुम्हाला कामी येईल,” असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. महिलांना मंत्रीमंडळ विस्तारात लवकरच स्थान दिलं जाईल असंही त्या म्हणाल्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *