Headlines

shivsena sanjay raut slams bjp cm eknath shinde gajanan kirtikar

[ad_1]

तीन महिन्यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असून आज सकाळी त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारला लक्ष्य केलं. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांशी शक्यताही व्यक्त केली आहे.

“गजानन किर्तीकर सोडून गेल्याचं दु:ख अधिक”

“अमोल किर्तीकर कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबतच आहेत. गजानन किर्तीकरांनी घेतलेल्या निर्णयात ते सहभागी नाहीत.त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. १०० दिवसांनी तुरुंगातून सुटल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला अमोल आमच्यासोबत राहिल्याचा झालाय. अशाच कडवट लोकांसोबत शिवसेनेचा प्रवास पुढे जाणार आहे. आम्हाला अनेक लोक सोडून गेले. पण गजानन किर्तीकर सोडून गेल्याचं दु:ख आम्हाला जास्त आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“..तर आपण राजकारण करायलाही उरणार नाही”

दरम्यान, महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जात असल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सत्ताधारी आणि विरोधकांनाही सल्ला दिला. “महाराष्ट्रातून प्रकल्प जात आहेत. यावर कुणीच काही बोलत नाहीये. एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा हे प्रकल्प का जात आहेत? यावर महाराष्ट्र म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून निर्णय घेणं गरजेचं आहे. राजकीय शत्रुत्व जपण्यासाठी उभा जन्म पडला आहे. पण महाराष्ट्र कमजोर झाला, तर आपण राजकारण करायलाही उरणार नाही याचं भान सत्ताधारी आणि विरोधकांनीही ठेवलं पाहिजे”, असं ते म्हणाले.

“…हे तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा जाणवलं”, संजय राऊतांनी मांडली स्पष्ट भूमिका; हिटलर काळाचा दिला संदर्भ!

“दिल्लीत मध्यावधीची तयारी सुरू झालीये”

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवणारं सूचक विधान केलं. “महाराष्ट्राचं राजकारण इतकं अस्थिर झालंय, की उद्धव ठाकरे सांगतायत ते खरंय. मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे. जे म्हणतात अमुक-तमुक आमच्यासोबत आहेत, त्यांच्यातच फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटिरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो”, असं ते म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *