Headlines

shivsena ramdas kadam slams ajit pawar ncp targets uddhav thackeray

[ad_1]

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दररोज शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेना नेत्यांची आणि आमदार-खासदारांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतली ही फूट नेमकी कुठे जाऊन थांबणार आहे? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. एकीकडे रामदास कदम यांची हकालपट्टी केली असताना आता रामदास कदम यांनी टीव्ही ९ शी बोलताना भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करतानाच रामदास कदम यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावेळी बोलताना कदम यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.

“अखेर शरद पवारांनी डाव साधला”

शरद पवार शिवसेना कशी फोडत आहेत, हे कागदपत्रांसह उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, असा दावा यावेळी रामदास कदम यांनी केला आहे. “मी मध्ये पत्रकार परिषद घेऊन शरद पवार कोकणातल्या कुणबी समाजाला सोबत घेऊन शासनाचे ५ लाख रुपये देऊन शिवसेना कशी फोडत आहेत, हे मी जाहीरपणे सांगितलं होतं. सगळी कागदपत्रं एकनाथ शिंदेंकरवी उद्धव ठाकरेंकडे पाठवली होती. तेव्हा जरी उद्धव ठाकरेंनी नोंद घेतली असती, तर आज ना एकनाथ शिंदेंवर ती वेळ आली असती, ना ५१ आमदारांवर ती वेळ आली असती ना रामदास कदमसारख्या कडव्या शिवसैनिकाला राजीनामा द्यावा लागला असता”, असं रामदास कदम यावेळी म्हणाले.

“किती लोकांची हकालपट्टी करणार आहात?”

आपल्या हकालपट्टीनंतर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. “तुम्ही नेमकी किती लोकांची हकालपट्टी करणार आहात? इतरांची हकालपट्टी करण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला नेमके कोण आहेत? तुमच्यासोबत शरद पवारांची माणसं कोण आहेत? ते बघायला हवं. उद्धव ठाकरे, अजूनही बघा. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी सोडावी, आम्ही मातोश्रीवर येतो असं म्हणून आमदार परत यायला तयार होते. पण ते उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही. मी भविष्यातही हा प्रयत्न करणार. उद्धव ठाकरेंना मी एकाकी सोडणार नाही”, असं कदम यावेळी म्हणाले.

“शरद पवारांनी शेवटी डाव साधला, आमची शिवसेना…”, पक्षफुटीवर बोलताना रामदास कदम यांचा गंभीर आरोप!

दरम्यान, यावेळी बोलताना कदम यांनी अनिल परब यांच्यावर देखील टीका केली. “उद्धव ठाकरे अनिल परबसारखी माणसं बाजूला घेऊन बसलेत. ते पक्षाच्या मुळावर उठलेत”, असं ते म्हणाले.

“तुम्ही कसली हकालपट्टी करता, मीच तुम्हाला…,” रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जाहीर टीका; खदखद मांडताना अश्रू अनावर

“अजित पवारांचं १०० चं टार्गेट होतं”

“माझ्या मुलाच्या मतदारसंघात १० कोटींचा निधी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कसा दिला, त्याची यादीच देतो आता मी. ही अवस्था शिवसेनेच्या सर्व आमदारांची आहे. अजित पवारांनी एक कलमी कार्यक्रम सुरू केला होता. ते सकाळी ७ वाजता मंत्रालयात जात होते. या माणसानं डाव साधला. जिथे जिथे शिवसेनेचे आमदार आहेत, तिथे त्यांच्या पडलेल्या आमदाराला निधी देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्यांचं १०० चं टार्गेट होतं. मुख्यमंत्री शिवसेनेचा बसवला आणि अजित पवारांना प्रशासकीय अनुभव चांगला असल्यामुळे त्यांनी तो डाव साधला”, असा आरोप रामदास कदम यांनी यावेळी केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *