shivsena mp sanjay raut attacks shinde camp after granted bail ssa 97शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत अखेर तुरुंगाबाहेर आले आहे. १०२ दिवसांनंतर पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर संजय राऊत आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. यावेळी गळ्यात भगवं उपरण आणि त्याच जोशात संजय राऊतांनी शिवसैनिकांना अभिवादन केलं. त्यानंतर एकच शिवसेना खरी आहे, बाकी सर्व धोतऱ्याच्या बिया आहे, असे म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

“१०० दिवसानंतर बाहेर आलो आहे, बाहेर काय चाललं याची माहिती मिळत नव्हती. शिवसेनेचा कणा मोडलेला नाही. मी लढणारा शिवसैनिक असून, आख्ख आयुष्य बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंबरोबर गेलं आहे. एकच शिवसेना खरी आहे, ती बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील, बाकी सर्व धोतऱ्याच्या कडू बिया आहेत. हा महाराष्ट्र आणि मुंबई कोणाच्या मागे उभी आहे कळेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “सत्यमेव जयते”, संजय राऊतांना जामीन मंजूर होताच सुनील राऊतांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, “शिवसेनेचा भगवा…”

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत विचारले असता? संजय राऊत म्हणाले, “गेल्या ३० ते ३५ वर्षापासून भगवा महापालिकेवर फडकत आहे. तो तसाच फडकत राहणार आहे. कोणी हात लावेल तर जळून खाक होतील, असे तेज त्या भगव्यात बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलं आहे. आता तर मशाल आहे,” असेही संजय राऊत यांनी सांगितलं.Source link

Leave a Reply