Headlines

shivsena mp arvind sawant criticized bjp over bjp attacks uddhav thackeray yakub memon grave controversy ssa 97

[ad_1]

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित केल्याचं समोर आलं होते. त्यावरून भाजपाचे नेते सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत आहेत. त्याला आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना याकूबची शवयात्रा काढून का दिली, असा सवाल अरविंद सावंत यांनी भाजपाला विचारला आहे.

अखिल वारकरी संघ राष्ट्रीय कीर्तनकार यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “याकूब मेमनच्या कबर आणि त्याच्यावरील सुशोभीकरणाबद्दल यांना भाना फुटला आहे. याकूबचा मृतदेह देण्यात आला होता, तेव्हा कुठे गेला होता. भाजपा आता भेकडांचा पक्ष झाला आहे. भाजपाकडून मुळ मुद्दा सोडून दुसरीकडे विषय नेण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे,” असा आरोपही सावंत यांनी भाजपावर लावला.

“मग त्याचं उदात्तीकरण करायला…”

“२०१५ साली याकूबला फाशी दिली गेली, तेव्हा तुमचेचं तथाकथित हिंदुत्ववादी सरकार होते. ओसामा बिन लादेनचा मृतदेह समुद्रात दगड बांधून टाकला, तसे याकूबबाबत का केलं नाही. त्याची शवयात्रा मोठ्या प्रमाणात निघाली, त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मग त्याचं उदात्तीकरण करायला का दिलं, असा प्रश्न अरविंद सावंत यांनी भाजपाला उपस्थित केला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *