shivsena leader vinayak raut criticized tanaji sawant after statement on aditya thackeray spb 94शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी आदित ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. यावरून शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सावंतांचा एकेरी उल्लेख करत प्रत्युत्तर दिले आहे. ”तानाजी कोण आहेत? आणि तुझी लायकी तरी आहे का, आदित्य ठाकरेंवर बोलायची”, असं विनायक राऊत म्हणाले.

विनायक राऊत काय म्हणाले?

”तानाजी सांवंत कोण आहेत आणि त्याची लायकी काय आहे? आयत्या बिळावर येऊन बसणारा हा सावंत आहेत. त्यामुळे तानाजी सावंतने शिवसेनेच्या भानगडीत पडू नये. शिवसेनेची ताकद शिंदे गटाला दिसेसच”, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली.

हेही वाचा – ‘एक साधा आमदार’ म्हणणाऱ्या बंडखोर तानाजी सावंत यांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले “त्यांना असाच विचार…”

पुढे बोलताना ते म्हणाले, ”शिंदे गट ही कीड आहे. ही कीड भाजपा पोसते आहे. भाजपाच्या तालावर नाचणारे हे लोक आहेत. यांनी स्वत:चा आवाज नाही राहिला आहे.”’

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले होते?

आदित्य ठाकरे पुण्यात कात्रज चौकात जिथे सभा घेणार असून तिथपासून काहीच अंतरावर तानाजी सावंत यांचं कार्यालय आहे. दुसरीकडे पुण्यात आज एकनाथ शिंदें यांचेही कार्यक्रम आहेत. याच पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांना आदित्य ठाकरे शक्तीप्रदर्शन करत आहेत का? असं विचारण्यात आलं होतं. त्यावर एकेरी उल्लेख करत ते म्हणाले. “आदित्य ठाकरे कोण आहेत? तो फक्त एक साधा आमदार आहे. यापेक्षा जास्त महत्त्व मी त्याला देत नाही”. आदित्य ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन कसलं, त्यांचा तर शक्तीपात झाला आहे असा टोलाही त्यांनी लगावला होता.Source link

Leave a Reply