shivsena leader uddhav thackeray attend shivsena group leader meeting in goregaonमुंबई महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावाही होणार आहे. दसरा मेळाव्याला अद्यापही परवानगी मिळाली नाही. तरीही, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावर शिवसेना ठाम आहे. त्यात आज ( २१ सप्टेंबर ) शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या टीकेचे बाण कोणाकोणावर चालतात याकडे राजकीय वर्तुंळाचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यांसह ४० आमदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाले. त्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात फिरत आहेत. यावेळी आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यापासून उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

आमदार, खासदार यांच्यानंतर शिवसैनिकांची देखील गळती सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेतील नेते चिंतेत आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांकडून शाब्दिक हल्ला करण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार? शिवसैनिकांना काय संदेश देणार? कोणावर निशाणा साधणार? मुंबई महापालिकेच रणशिंग फुंकणार का? याकडे पाहावे लागणार आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात गटप्रमुखांचा हा मेळावा होणार आहे.Source link

Leave a Reply