shivsena-leader-arvind-sawant-share-achild Shiv Sainik-video-who-enjoying-uddhav-thackeray-speech | Loksatta



शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये शिवसेनेवरुन सुरु असलेल्या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदेसोबत ४० पेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली आहे. आता आमदारांनंतर १२ खासदारांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या गोंधळादम्यान शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी आपल्या ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ कोणत्या राजकीय नेत्याचा नसून एका बाल शिवसैनिकाचा आहे. मात्र, हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

हेही वाचा- ठाकरे विरुद्ध शिंदे : निवडणूक आयोगाने शिवसेनेसंदर्भात दिलेल्या ‘त्या’ निर्देशांविरोधात उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात

बाल शिवसैनिकाचा व्हिडिओ व्हायरल

शिवसेना… नाते जिव्हाळ्याचे, स्नेहाचे… पिढ्यापिढ्यांचे…! असे कॅपशन देत सावंतांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडिओ दाखवण्यात य़ेत आहे. ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. मात्र, या गर्दीमध्ये एक बाल शिवसैनिक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. वडिलांच्या खांद्यावर बसलेला हा लहान मुलगा उद्धव ठाकरेंच्या भाषणावर जोरजोरात टाळ्या वाजवताना, जयजयकार करताना दिसत आहे. सावंतानी हा व्हिडिओ आपल्या ट्वीटर अकांउंटवरुन शेअर केला आहे. सोबतच त्यांनी आदित्य ठाकरेंसोबत शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर अकांऊटलाही हा व्हिडिओ टॅग केला आहे.

हेही वाचा- MPSC Updates : पुण्यात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित; पोलिसांचा कडक बंदोबस्त

८ ऑगस्टला निडणूक आयोगासमोर सुनावणी

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना पक्षावरुन सुरु असलेला वाद आता निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे. येत्या ८ ऑगस्टला आयोगासमोर याबाबत सुनावणी घेण्यात य़ेणार आहे. त्यापूर्वी बहुमताबाबतचे कागदोपत्री पुरावे सादर करण्याचा निर्देश आयोगाने दोन्ही गटांना दिला आहे. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणावर शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या दाव्याबाबतही त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यामुळे शिवसेना खरी कोणाची याबाबत लवकरच फैसला होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिंदे गटाच्या याच मागणीविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. ठाकरे गटाने शिंदे गटाच्या या मागणविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.



Source link

Leave a Reply