shivsena leader aaditya thackeray attacks cm eknath shinde over vedanta foxconn project mover gujrat ssa 97



वेदांत समूह आणि फॉक्सकॉन माध्यमातून महाराष्ट्रात १ लाख ६६ हजार रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, वेदांत समूहाने गुजरातमध्ये आपला प्रकल्प उभा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप आहेत. फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

“चाळीस गद्दारांनी सरकार पाडलं, त्यामुळे फॉक्सकॉन प्रकल्प रखडला. एक लाख रोजगार राज्याच्या बाहेर गेले, याची जबाबदारी कोण घेणार आहे. वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला, याचं उत्तर अद्यापही मिळालं नाही. जेव्हा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात होता, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती दर्शनात व्यस्त होते. आता नवरात्र येणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी गरबा, दांडियासाठी न फिरता थोडेसे लक्ष द्यावे,” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर

“रायगडमध्ये बल्क ड्रग पार्क प्रकल्प येणार होता. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहलं होते. सुभाष देसाई यांनी त्याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता. मात्र, केंद्र सरकाराने गुजरात, आंध्रप्रदेश आणि हिमाचलला बल्क ड्रग पार्कबाबात विचारणा केली आहे. त्यात आता गुजरातमधील भरूचमध्ये हा बल्क ड्रग पार्क सुरु होणार आहे,” असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply