Headlines

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा शरद पवारांचा त्यामागे हात, केसरकरांचा गंभीर आरोप | Shivsena Deepak Kesarkar allegations on NCP Sharad Pawar over Rebel Narayan Rane Chhagan Bhujbal Raj Thackeray sgy 87

[ad_1]

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती असा दावाही दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते असंही त्यांनी सांगितलं.

केसरकर नेमकं काय म्हणाले –

“मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे,” असं केसरकर म्हणाले आहेत.

“आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत. मी राष्ट्रवादीत असताना ते विश्वासात घेऊन सांगायचे. शरद पवारांनीच मला, जरी मी नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवलेली नाही. हा निश्चितच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती. भुजबळांना तर ते स्वत: बाहेर घेऊन गेले होते. राज ठाकरेंच्या पाठीशीही त्यांचे आशीर्वाद होते. राज ठाकरे त्यांना मानतात,” असं केसरकरांनी सांगितलं आहे.

राणे यांनी ‘मातोश्री’वर बोलण्याचे टाळावे – दीपक केसरकर

“मातोश्री कधी सिल्व्हर ओकच्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही शरद पवारांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना हे कधीही मान्य नव्हतं. शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही,” असं केसरकरांनी सांगितलं.

“उद्धव ठाकरेंना चुकीच्या नेत्यांचं मार्गदर्शन”

शिवसेनेच्या वतीने मंत्रिमंडळाचा शपथविधी रोखण्यासाठी पत्र देण्यात आल्यासंबंधी विचारण्यात आलं असता केसरकर म्हणाले की, “लहानपणी क्रिकेट खेळताना ज्याचा बॅट, बॉल असतो तो आऊट झाल्यावर सगळं घेऊन घरी जातो. याला आम्ही रडीचा जाव म्हणायचो. हा रडीचा खेळ राजकारणात असता कामा नये. राजकारण सर्वसामान्यांसाठी असून ते त्यांच्यासाठीच केलं पाहिजे”. उद्धव ठाकरेंना चुकीच्या नेत्यांचं मार्गदर्शन होत असल्याने अशी पावलं उचलली जात असावीत असा आरोप केसरकर यांनी केला.

शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी आम्ही एका महिला आदिवासी उमेदवाराला पाठिंबा दिला याचा अर्थ भाजपाला नाही असं विधान केलं होतं. यावर बोलताना ते म्हणाले की, “नरेंद्र मोदींनी त्यांना उमेदवारी दिली आहे. आजपर्यंत एकही आदिवसी आणि विशेषकरुन महिला या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली नाही”.

“जर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावलं तर…”, दीपक केसरकर यांचं मोठं विधान

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “हा पाठिंबा कोणा एका व्यक्तीचा नसून, महाराष्ट्राच्या जनमताचं प्रतिक आहे. बाळासाहेब ठाकरे प्रसंगी एनडीएच्या बाहेर जाऊन मतदान करायचे. उद्धव ठाकरेंनी आज तो गित्ता गिरवला आहे, याबद्दल मला सार्थ अभिमान आहे”.

“बाळासाहेबांनी मी शेवटची व्यक्ती असलो तरी मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, पाठिंबा देणार नाही असं सांगितलं होतं. मग त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेने काँग्रेससोबत जाणं ही त्यांच्या विचारांशी प्रताडणा आहे असं मी समजतो. जर बाळासाहेबांना एक सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर पाहायचा होता, तर हा एक सुखद धक्का आहे,” असं केसरकरांनी सांगितलं.

“मला महाराष्ट्रभरातून असंख्य फोन येतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा आनंद आहे, पण त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंचे आशीर्वादही हवेत असं सांगतात. हे आशीर्वाद मिळतील तेव्हा प्रत्येक शिवसैनिक आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं सांगेल,” असंही केसरकरांनी नमूद केलं.

आमचे खासदारही भाजपाला पाठिंबा देतील तेव्हा आम्ही एनडीएत सहभागी झालो असं म्हणू शकतो. महाराष्ट्राचा विधिमंडळ पक्ष भाजपासोबत गेल्याने आम्ही तांत्रिकदृष्ट्या एनडीएत सहभागी झालो आहोत असंही त्यांनी सांगितलं.

भाजपाकडून शिंदे गटाला अधिकृत मान्यता आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “महाराष्ट्रात चुकीचं पसरवलं जात आहे. मला अनेकांनी फोन करुन उद्धव ठाकरेंना दिल्लीत निमंत्रण का नाही असं विचारलं. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नेहमी मातोश्रीवर गेला आहे. मातोश्रीचा प्रतिनिधी कधीही राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासंबंधी बैठकीला गेलेला नाही. तीच महती कायम ठेवली पाहिजे असं मी मानतो”.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *