Headlines

Shivsena Chief react on Amit Shah saying Uddhav Thackeray Needs To Be Taught A Lesson scsg 91



केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना “त्यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे” असं विधान केलं. या विधानावर आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली असून भाजपाला साथ देणाऱ्या एकानाथ शिंदे गटातील आमदारांचाही अगदी दोन शब्दांमध्ये समाचार या विषयावर भाष्य करताना घेतला आहे. ‘‘भाजपा आणि जनतेला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये भुईसपाट करा. धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे’’, अशी भूमिका घेत शाह यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करून भाजपा आगामी निवडणुका लढवणार असून, मुंबईसह महाराष्ट्रात भाजपाचे वर्चस्व आणि सत्ता राहील, यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश शहा यांनी दिले. याच भाषणाला संदर्भ उद्धव यांनी मातोश्रीवर काही मोजक्या शिवसेना आमदार आणि खासदारांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत दिला.

नक्की पाहा >> Photos : मध्यरात्री ‘मातोश्री’वरुन फडणवीसांचा फोन, अडीच मिनिटांची बंद खोलीतील भेट अन्…; अमित शाहांनी सांगितला युती तुटल्याचा घटनाक्रम

आपला दोन दिवसांचा मुंबई दौरा आटपून दिल्लीला परतलेल्या शाह यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या मुंबईतील खासदार-आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वानी सज्ज राहून, भाजप-शिंदे गटाच्या विजयासाठी आणि भाजपच्या वर्चस्वासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. ‘‘राजकारणात सारे काही सोसले, तरी दगाबाजी सहन करू नका. जे दगा देतात, त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतील राजकारणात भाजपाचे वर्चस्व दाखविण्याची आणि उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे’’, असे शाह यावेळी म्हणाले. शाह यांनी या भेटीदरम्यान लालबागच्या राजाचं दर्शनही घेतलं. याचाच संदर्भ देत उद्धव यांनी टोला लगावला आहे.

नक्की वाचा >> “शिंदे गट आणि मनसे एकत्र…”; BMC Election संदर्भातील ‘तो’ प्रश्न ऐकताच फडणवीस हसत म्हणाले, “मला खूप मजा येते जेव्हा…”

“काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही बघितल्या आपण. ते मंगलमूर्तीच्या दर्शनाला आले होते. ती मंगलमूर्ती आहे तिथे अभद्र काही बोलू नये पण ते बोलून गेले,” असा टोला उद्धव यांनी अमित शाह यांचा थेट उल्लेख न करता लगावला. तसेच पुढे बोलताना उद्धव यांनी, “गणपतीच्या मंडळामध्ये सुद्धा त्यांना राजकारण दिसलं त्याला आपण काही करु शकत नाही,” असंही म्हटलं. “मी एवढं सांगेन की गणपती हा बुद्धीदाता आहे. सर्वांना त्याने सुबुद्धी द्यावी हीच माझी गणरायाकडे प्रार्थना आहे,” अशी खोचक प्रतिक्रिया उद्धव यांनी दिली.

नक्की वाचा >> “भाजपा आणि शिवसेना ओरिजिनल म्हणजे शिंदे गट, आम्ही…”; अमित शाहांच्या ‘भुईसपाट करा’ विधानानंतर फडणवीसांचं सूचक वक्तव्य

“काल ते येऊन बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवायची. दाखवा. ती जमीन दाखवल्यानंतर त्यावर काय बोलायचं ते बोलू. थोडक्यात सांगायचं तर आता संघर्षाचा काळ आहे. शिवसेना ते संपवायला निघालेले आहेत. या संघर्षाच्या काळात जो सोबत राहतो तो आपला,” असंही उद्धव यांनी आमदारांसोबतच्या या खासगी बैठकीमध्ये म्हटलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी उपस्थित आमदारांचा उल्लेख करत त्यांनी निष्ठा विकली नाही असं म्हटलं. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे गटातील ४० फुटीर आमदारांवर टीका करताना उद्धव यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या वाक्याचा संदर्भ दिला.

शिंदे गटाचा अप्रत्यक्षपणे ‘नासलेली लोक’ असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला. “भास्करराव, रविंद्र वायकर, अनिल परब, सुनिल प्रभू आणि इतर आमदाराही इथे आहेत. या आमदारांना ते लालूच दाखवून नेऊ शकत होते. का नाही नेऊ शकले? कारण शेवटी निष्ठा हा असा विषय असतो की तो कोणी कितीही बोली लावली तरी तो विकला जाऊ शकत नाही आणि कोणी विकतही घेऊ शकत नाही. त्यामुळे हे सर्व निष्ठावान सोबत राहिले. बाळासाहेब सांगायचे तसेच नासलेली लोक असण्यापेक्षा मूठभर का असेना निष्ठावान असले तरी मैदान निघतं सगळं,” असं उद्धव म्हणाले.



Source link

Leave a Reply