Headlines

shivsena leader Aditya Thackrey criticized rebellion mla eknath shinde

[ad_1]

शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांवर पुन्हा एकदा युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी टीकास्त्र डागलं आहे. “गेल्या दिवाळीत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर हे आमदार, खासदार पोटभर जेवून गेले, त्यांनी फोटो काढले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक साधी रेघ देखील उमटली नाही. पुढे याच आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली”, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.

“एकनाथ शिंदे काय बोलतील, याचा नेम नाही” मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ घोषणेवरून एकनाथ खडसेंचा टोला

ही गद्दारी शिवसेनेसोबत नाही तर माणुसकीसोबत आहे. हे सर्व आमदार निर्लज्ज असून आजवर मुखवटे घालून फिरत होते, अशी टीकाही ठाकरेंनी केली. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षबांधणीसाठी आदित्य ठाकरे सध्या मैदानात उतरले आहेत. शिवसंवाद यात्रेदरम्यान जळगावमध्ये ते बोलत होते. “गेल्या दिवाळीत उद्धव साहेबांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यावेळी त्यांना मदत करण्याऐवजी हे बंडखोर आमदार सरकार पाडण्याच्या तयारीत होते”, असे आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“कितने आदमी थे? ६५ में से ५० गए और…”, देवेंद्र फडणवीसांची भाजपा मेळाव्यात तुफान टोलेबाजी!

शिवसेनेतील ४० आमदारांनी हिंदुत्वासाठी नाही तर काही लोकांच्या राक्षसी महत्वाकांक्षेपोटी पक्षाशी बंडखोरी केली. शिंदे सरकार बेकायदेशीर सरकार असून लवकरच ते कोसळेल, असे ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, आज मुंबईत भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. “महाभारत बदलत चाललं आहे, देवेंद्ररुपी कृष्णाने कर्णरुपी एकनाथाला युद्धातून बाजूला काढले” असे म्हणत शेलारांनी महाभारताचा दाखला देत शिवसेनेला चिमटा काढला. मुंबई महापालिका क्षेत्रातील विकासकामांवरुनही भाजप नेत्यांनी शिवसेनेला धारेवर धरले. ४५ हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेनं मुंबईकरांना कोणत्या सुविधा दिल्या? असा सवाल भाजपा नेत्यांनी विचारला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *