Headlines

शिंदेंना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या विधानावर राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | Shivsena Sanjay Raut on BJP Chandrakant Patil Statement over Devendra Fadnavis Eknath Shinde CM Post sgy 87



मनावर दगड ठेवून भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आपल्याला दु:ख झाले, अशी कबुली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पनवेलमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी आणि कार्यसमितीच्या बैठकीचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केलं. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात पडसात उमटत असून, भाजपाने संबंधित व्हिडीओ समाजमाध्यमांवरुन डिलीट केला आहे. या वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्रीपद!; चंद्रकांत पाटील यांचे विधान

चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं गेल्याचं वक्तव्य केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की “भाजपामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. तिथे मनमोकळेपणाने मत व्यक्त करता येत नाही. तरीही मी चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन करतो, त्यांनी थोडा काळ कोल्हापुरचं पाणी दाखवलं. जे त्यांच्या पोटात मळमळत होतं, ते ओठावर आलं. ही भाजपाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असा खुलासाही त्यांना करावा लागला. त्या भावनेचा आदर व्हायला हवा होता”.

फडणवीसांनी ‘लाऊडस्पीकर’ असा उल्लेख केल्यानंतर संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले “तुम्हाला बधीर केल्याशिवाय…”

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

भाजपा व शिवसेना युतीला २०१९ मधील निवडणुकीत बहुमत मिळूनही शिवसेनेने विश्वासघात करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, असे सांगून पाटील म्हणाले, करोनाकाळात जनतेचे खूप हाल झाले. सरकारविरोधात कोणी टिप्पणी केल्यास तुरूंगात डांबले गेले. राज्याची विकासगती मंदावली. गेल्या अडीच वर्षांतील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला. हा बदल होत असताना योग्य संदेश जाईल आणि चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल, असा एक नेता देण्याची गरज होती. त्यामुळे मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आपल्या सर्वाना दु:ख झाले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले होते. मात्र, त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने दिला आणि तो फडणवीस यांनी मान्य केला, असे पाटील म्हणाल़े पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार फडणवीस यांच्या त्यागाबद्दल सर्वानी त्यांना उभे राहून अभिवादन केले.

व्हिडीओ केला डिलीट

दरम्यान, पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ भाजपाने सोशल मीडियावरुन तातडीने काढून टाकला. हा व्हिडीओ कसा व का बाहेर आला, हा आमचा अंतर्गत प्रश्न असून तो सोडविला जाईल, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

भाजपकडून सारवासारव

‘‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याने दु:ख झाले हे प्रदेशाध्यक्षांचे मत नाही़ त्यावेळच्या घडामोडी व प्रसंगाबाबत कार्यकर्त्यांच्या मनातील भावार्थ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला’’, अशी सारवासारव भाजपा नेते अ‍ॅड. आमदार आशीष शेलार यांनी केली.



Source link

Leave a Reply