Headlines

शिंदे सरकारचा ठाकरेंना आणखी एक धक्का, मुंबई महापालिकेतील वॉर्डची संख्या केली पूर्ववत | ward number in mumbai municipal corporation reduced to 227 from 236

[ad_1]

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांत बदल किंवा दुरुस्ती केली जात आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे सरकारने मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६ सदस्यांऐवजी २२७ सदस्य संख्या होईल. तसेच इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येतही सुधारणा केली जाणार आहे.

हेही वाचा >>> पक्षातील बंडखोरीनंतर तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार? शिवसेनेचा बडा नेता म्हणतो “त्यात काही…”

३ लाखांपेक्षा अधिक व ६ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांची किमान संख्या ६५ इतकी तर कमाल संख्या ८५ इतकी असेल. ३ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १५ हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. ६ लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ८५ इतकी तर कमाल संख्या ११५ इतकी असेल.

हेही वाचा >>> “बंडखोरांच्या गाड्याच नव्हे तर तोंडही फोडू” शिवसेना नेत्याचे विधान

६ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक २० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. १२ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ४० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. २४ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.

हेही वाचा >>> “…तर शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाही”; उदय सामंतांवरील हल्ल्यासंदर्भात बोलताना शिवसेना नेत्याचा बंडखोरांना इशारा

३० लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १ लाख लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. १२ लाखांपेक्षा अधिक व २४ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ११५ इतकी तर कमाल संख्या १५१ इतकी असेल. २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १५१ इतकी तर कमाल संख्या १६१ इतकी असेल. ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १६१ इतकी तर कमाल संख्या १७५ इतकी असेल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *