Headlines

शिंदे गट-उद्धव ठाकरेंच्या वादावरील निकालावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रया, जयंत पाटील म्हणाले…| jayant patil comment over supreme court verdict on eknath shinde group and uddhav thackeray shivsena clash

[ad_1]

शिवेसनेतील शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. खरी शिवसेना कोणाची? हे ठरवण्याबाबतच्या सुनावणीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. उद्धव ठाकरे गटाने याबाबत केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाच्या याच निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >> शिंदे गट-उद्धव ठाकरे वादावरील निकालानंतर अमृता फडणवीसांचे महत्त्वाचे विधान, म्हणाल्या…

खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याची मागणी करणारा शिवसेनेचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. हा निकाल प्रमुख आहे, असे मला वाटत नाही. मात्र निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीला थांबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केले आहे. आता निवडणूक आयोग त्यावर कारवाई सुरू करेल. उद्धव ठाकरे निवडणूक आयोगातील सुनावणीमध्ये आपली बाजू मांडतील. त्यामुळे आयोगाच्या निकालापूर्वीच काही प्रतिक्रिया देणे अतिरंजित होईल, असे जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा >> C Hearing over Thackeray vs Shinde Faction Live: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार

सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी मागणी ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. यामुळे आता निवडणूक आयोगालाच ‘खरी शिवसेना कोण?’ हा निर्णय घ्यावा लागणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *