Headlines

शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं असताना मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट, म्हणाले, “मी भाग्यवान आहे की…” | Milind Narvekar tweet amid speculations of joining Shinde faction of Shivsena

[ad_1]

शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा केला. यानंतर राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. ही चर्चा सुरू असताना मिलिंद नार्वेकर कुठे आहेत? असाही प्रश्न विचारला गेला. या चर्चांमध्ये आता स्वतः मिलिंद नार्वेकरांनी यांनी एक ट्वीट केलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये मिलिंद नार्वेकर म्हणाले, “मी भाग्यवान आहे की, मला सरन्यायाधीश उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांच्यासमवेत श्री व्यंकटेश्वरा स्वामी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या पाचव्या दिवशी गरुड वाहन पुजेचा साक्षीदार होता आलं.”

गुलाबराव पाटील काय म्हणाले होते?

बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंद गटात सहभागी होतील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

“गुलाबराव पाटलांनी ५० खोके घेतले मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तोदेखील यांना सोडून आला. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत,” असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. मात्र, त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल वारंवार विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं म्हटलं. एक दिवस तरी राजकीय विषय सोडा, असंही ते मिश्कीलपणे प्रसारमाध्यमांना म्हणाले.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मिलिंद नार्वेकरांसारखे नेते असं काही करतील यावर कुणाचाच विश्वास नाही. कारण राज ठाकरे, नारायण राणे प्रचंड आरोप केले होते. त्यातूनही ते तावून सलाखून निघाले. आज ते तिरुपती सारख्या आध्यात्मिक संस्थेवर आहेत. त्यांची सद्बुद्धी नेहमीच चांगली असते. मात्र, आता ते शिंदे गटात जाणार की नाही याविषयी मला काहीही माहिती नाही.”

हेही वाचा : “माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको, कारण…”, शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तारांचं मोठं विधान

“आम्हाला आजही खात्री आहे की, मिलिंद नार्वेकर असं काही करणार नाहीत. तशी नक्कीच शक्यता नाही,” असंही किशोरी पेडणेकरांनी नमूद केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *