Headlines

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अमित ठाकरेंना खरंच मंत्रीपद मिळणार आहे का? राज ठाकरेंनी केलं स्पष्ट | MNS Raj Thackeray on reports of Amit Thackeray Cabinet Eknath Shinde Devendra Fadanvis Maharashtra Government sgy 87

[ad_1]

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यादरम्यान राज ठाकरे यांना मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. एबीपी माझाशी बोलताना राज ठाकरेंनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपाकडून अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र राज ठाकरेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

राज ठाकरेंचा शिंदे सरकारला पाठिंबा, पण अमित ठाकरेंचा ‘या’ निर्णयाला विरोध; म्हणाले “माणूस नावाचा प्राणी…”

मनसेला मंत्रिपद दिले जात असेल तर आमचा त्याला विरोध – रामदास आठवले

अमित ठाकरेंना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं वृत्ताला राज ठाकरेंनी दुजोरा दिलेला नाही. ही बातमी खोटी असून, कोणीतरी केलेला खोडसाळपणा असल्याचं सांगितलं आहे. तसंच कोणीतरी जाणुनबुजून राजकीय वातावरण निर्माण कऱण्यासाठी आमच्या नावांचा वापर करत असल्याचंही म्हटलं आहे. राज ठाकरेंनी हे वृत्त पसरवणाऱ्यांवर नाराजीदेखील जाहीर केली आहे.

मनसेचा शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पत्र लिहून कौतुकही केलं होतं. तसंच राज्यसभा, विधान परिषद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेने भाजपाला मदत केली होती. यावेळी मनसेला दोन मंत्रीपदं मिळणार असल्याची चर्चा होती. पण राज ठाकरेंनी त्यावर कोणतंही भाष्य केलं नव्हतं. पण अमित ठाकरेंच्या नावाची चर्चा रंगू लागल्यानंतर अमित ठाकरेंनी वृत्ताचं खंडन केलं आहे.

सरकार स्थापनेतील मनसेचा महत्वपूर्ण सहभाग –

“ राज्यसभा, विधानसभा निवडणूक आणि राज्यात शिंदे सरकार स्थापन होण्यात मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून महत्वपूर्ण भूमिका बजावली. राज्यात शिंदे यांच्या सोबत भाजपाने सत्ता स्थापनेचा निर्णय घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला संपर्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केला. राज ठाकरे यांनी होकार दर्शविताच सत्ता स्थापनेच्या पुढील हालचालींना अधिक वेग आला. राज ठाकरे यांनी तिन्ही वेळा विनाअट पाठिंबा दिला आहे. शिंदे सरकारने मनसेला मंत्रिपद द्यावे अशी कोणतीही अट मनसेने सरकारला घातली नाही. परंतु, सरकार स्थापनेतील मनसेचा महत्वपूर्ण सहभाग याचा विचार सरकारकडून निश्चित केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही जाणीव असल्याने नक्कीच मनसेला मंत्रिपद मिळेल.”, असे मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं होतं.

मनसेला मंत्रिपद दिले जात असेल तर आमचा त्याला विरोध – रामदास आठवले

“राज्य सरकारमध्ये मनसेला मंत्रिपद देण्याची हालचाल सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. यापुर्वीच्या निवडणुकांमध्ये मनसे हा भाजपा, रिपब्लिकन पक्षासोबत कधीच नव्हता. त्यामुळे मनसेला मंत्रिपद देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अशाही परिस्थितीत मनसेला मंत्रिपद देण्यात येत असेल तर आमचा त्याला विरोध असेल.”, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी याआधीच स्पष्ट केली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *