Headlines

शेतकरी आंदोलनासमोर केंद्र सरकार नरमले , तिन्ही कृषि कायदे माघार घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून केली घोषणा ‘तीनही कृषी कायदे मागे घेणार’

उत्तर प्रदेशातील अनेक योजनांच्या पायाभरणी आणि उद्घाटनासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, “माझ्या पाच दशकांच्या कार्यकाळात मी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या आहेत. जेव्हा देशाने मला पंतप्रधान केले तेव्हा मी कृषी विकास किंवा शेतकऱ्यांच्या विकासाला सर्वाधिक महत्त्व दिले होते.”

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi )यांनी आज प्रकाशपर्व निमित्त देशाला संबोधित केले आणि यादरम्यान त्यांनी तीनही कृषी कायदे (3 agricultural Bill)मागे घेण्याची घोषणा केली. तीनही कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, कृषी अर्थसंकल्पात पूर्वीच्या तुलनेत 5 पट वाढ करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील अनेक योजनांच्या पायाभरणी आणि उद्घाटनासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, “माझ्या पाच दशकांच्या कार्यकाळात मी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या आहेत. जेव्हा देशाने मला पंतप्रधान केले तेव्हा मी कृषी विकास किंवा शेतकऱ्यांच्या विकासाला सर्वाधिक महत्त्व दिले होते.

” पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या सरकारने गेल्या सात वर्षांत देशातील शेतीच्या विकासासाठी अनेक पावले उचलली आहेत. ते म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्यात आल्याने कृषी उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे. पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे. याशिवाय विमा आणि पेन्शनही देण्यात आली. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply