Shattila Ekadashi 2023: आज षटतिला एकादशी; चुकूनही करू नका ‘ही’ कामं, आयुष्यभर पश्चाताप कराल


Shattila Ekadashi 2023: (Hindu) हिंदू धर्मामध्ये व्रतवैकल्य आणि तत्सम सर्वच गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्वं आहे. या धर्मामध्ये असणाऱ्या मान्यतांनुसार दर महिन्याला येणाऱ्या एकादशीच्या (Ekadashi) दिवशी भगवान विष्णुची पूजा केली जाते. हा दिवस विष्णूला समर्पित असतो. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अशाच एकादशीला षटतिला एकादशी असं म्हणतात. या दिवशी विष्णूची यथासांग पूजा केली जाते. तर, या दिवशी अनेकजण उपवासही ठेवतात. अशी धारणा आहे की, या दिवशी (Vishnu) विष्णूच्या पुजेमुळं आणि उपवासामुळं पापांपासून मुक्ती मिळवता येते. सोबतच आजारपण, दोष आणि भीतीपासूनही मुक्ती मिळते. (Shattila Ekadashi 2023 upay importance and significance)

ज्योतिषामध्ये या एकादशीला प्रचंड महत्त्वं 

ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) दिलेल्या माहितीनुसार या दिवशी दान आणि स्नानाचं महत्त्वं आहे. या दिवशी (Ganga snan) गंगेत स्नान केल्यास आणि दान केल्यास पुण्यप्राप्ती होते. यंदाच्या वर्षी आलेल्या (Shattila Ekadashi ) षटतिला एकादशीला पुण्यप्राप्तीसाठी अनेकजण प्रयत्नशील असतील. कारण, या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी विण्णूची मनोभावे पूजा केल्यामुळं फलप्राप्ती होती. बरं, या दिवशी तुमच्याकडून काही चुका झाल्या तर, वैकुंठाची दारं कामयस्वरुपी बंद होतात असंही म्हटलं जातं. 

आजच्या दिवशी तयार होणारे शुभ योग खालीलप्रमाणे 

17 जानेवारीला सायंकाळी 6.05 वाजता एकादशीला सुरुवात झाली आणि ही एकादशी बुधवार, 18 जानेवारी सायंकाळी 4.03 मिनिटांनी समाप्तीस जाईल. एकादशीचा उपवास 18 तारखेला म्हणजेच बुधवारी ठेवण्यात येईल. 

18 जानेवारीला सकाळी 07:02 ते सायंकाळी 05:22 पर्यंत सर्वार्थ सिद्धी आणि अमृतसिद्धी योग असेल. तर, याच दिवशी सकाळी 5.58 मिनिटांपासून दुपारी 02.47  मिनिटांपर्यंत वृद्धी योग असेल. 

आजच्या दिवशी ‘ही’ कामं चुकूनही करु नका 

– ज्योतिषविद्येमध्ये दिलेल्या माहितीनुसार आज झाडांच्या फांद्या तोडू नका. कोणत्याही वृक्षाला इजा पोहोचवू नका. 

– आजच्या दिवशी भातासोबत चुकूनही वांगं खाऊ नका. असं केल्यास वैकुंठाची दारं बंद होतील. 

– आज राजावर ताबा ठेवा. कोणाशीही हुज्जत घालू नका. खोटं बोलू नका. 

– आजच्या दिवशी उपवास ठेवणार असाल तर त्यावेळी ब्रह्मचर्याचं पालन करा. झोपण्यासाठी मऊ गादीचा वापर टाळा, जमिनीवरच आराम करा. 

– हिंदू धर्मात एकादशी अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते. या दिवशी काही नियमांचं पालन केल्यास व्यक्तीला वैकुंठ प्राप्ती होते. त्यामुळं चुकूनही तामसिक आहार घेऊ नका. कांदा- लसुण, मांस- मद्य यांचं सेवन टाळून फक्त सात्विक आहार घ्या. 

 

(वरील माहिती धार्मिक आणि आध्यात्मिक धारणांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)Source link

Leave a Reply