शरीराबाबत कमरेखालच्या अभद्र कमेंट करणाऱ्यांनी ओलांडल्या मर्यादा; अभिनेत्रीनं दिलेलं उत्तर एकदा पाहाच


मुंबई : कलाकार कोणत्याही चित्रपटांमध्ये किंवा एखाद्या सीरिजमध्ये काम करतात, त्यामागचा हेतू असतो तो म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा. पण, प्रेक्षक मात्र कलाकारांच्या कलेकडे अनेकदा बऱ्याच चुकीच्या नजरेतून पाहतात आणि तेव्हा खरंच मर्यादा ओलांडल्या जात आहेत का, हाच प्रश्न डोक्यात घर करु लागतो.

मुळात कलाकारही हल्लीच्या दिवसांमध्ये प्रेक्षकांसोबतचं नातं अतिशय सुरेखपणे जपताना दिसतात. पण, नेटकरी मात्र त्यांच्या या सवयीला दूर लोटताना दिसत नाहीत.

अभिनेत्री मृणाल ठाकूर हिला सध्या अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला जिथं तिच्यावर शरीराच्या कमरेखालच्या भागावर कमेंट करण्यात आली. हे पाहिल्यानंतर तिच्या संतापाचा पारा चांगलाच वर गेला.

मृणालनं इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला. ज्यामध्ये ती चित्रपटातील साहस दृश्यांसाठी प्रशिक्षण घेताना दिसली. तिच्या या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी ‘लोअर पार्ट’ बद्दल अशा काही कमेंट केल्या ज्या तिलाही सहन झाल्या नाहीत.

कोणी तिच्या शरीराची तुलना एका मडक्याशीही केली. जे पाहता, ऐका अनेकजण यासाठीच पैसे मोजतात, अशा शब्दांत तिनं इथं कमेंट केली.

Mrunal Thaku

मृणालनं नेटकऱ्यांच्या अभद्र कमेंटवर उत्तर देणारी एक पोस्ट इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली. ‘तुम्हाला काही अंदाज तरी आहे, की सुदृढ राहण्यासाठी आम्ही किती मेहनत घेतो? माझं शरीर हे असंच आहे, याचं मी काही करु शकत नाही.

माझ्याकडे एकच उपाय आहे. तो म्हणजे ते मिरवण्याचा. मी सुदृढ राहण्यासाठी फार प्रयत्न करत आहे’, असं ती म्हणाली.Source link

Leave a Reply