Headlines

Shardul Thakur: लॉर्ड नाही तर शार्दूलचं ‘हे’ आहे निकनेम; रोहित शर्माने केला मोठा खुलासा

[ad_1]

Shardul Thakur New Nickname : न्यूझीलंडविरूद्धची (IND vs NZ) वनडे सीरिज जिंकल्यानंतर रोहित शर्माने मान्य केलं की, ऑस्ट्रेलियाविरूद्ध पुढच्या महिन्यात होणारी चार सामन्यांची टेस्ट सीरिज सोपी नसणार आहे. मात्र नंबर 1 टेस्ट टीम असणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी (IND vs Aus) मुकाबला करण्यासाठी भारत टीम पूर्णपणे तयार आहे. दरम्यान वनडे सीरिज जिंकल्यानंतर लॉर्ड शार्दुलबाबत (Shardul Thakur) रोहित शर्माने एक मोठा खुलासा केला आहे. 

सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, मी ईमानदारीने सांगतो की, आम्ही रँकींगबद्दल जास्त बोलणं करत नाही. ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळणाऱ्या सामन्यांमध्ये आम्ही कोणताही बदल करणार नाही आहोत. आमच्यासाठी हे साध-सोपं आव्हान नसेल.

शार्दुल ठाकुरबाबत केला मोठा खुलासा

शार्दुल ठाकुरला सोशल मीडियावर चाहत्यांना ‘लॉर्ड’ असं नावं दिलं आहे. मात्र टीममधील इतर खेळाडू त्याला मॅजिशीयन म्हणतात. रोहित शर्मा म्हणतो, शार्दुल गेल्या काही काळापासून टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करतो. लोकं त्याला मॅजिशियन म्हणतो आणि त्याने पुन्हा एकदा हे दाखवून दिलं आहे.

भर मैदानात रोहितने शार्दुलला सुनावलं

मंगळवारच्या सामन्यात एक वेळ अशी आली होती, ज्यावेळी 2 विकेट्स घेऊन देखील कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीशी खुश नव्हता. याचं कारण म्हणजे एका ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉल्समवर कॉन्वेने सलग 2 फोर मारल्या होत्या. यामुळे रोहित शर्मा शार्दुलवर (Rohit Sharma angry on shardul thakur) संतापला होता.  

कॉन्वेने शार्दुलला सलग 2 फोर मारल्यानंतर रोहित निराश झाला. रोहित तातडीने शार्दुल ठाकूरकडे गेला आणि त्याला 10 सेकंद चांगलंच सुनावलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पुन्हा एकदा भर मैदानात रोहित शर्माचा रूद्र अवतार पहायला मिळाला. मुख्य म्हणजे, संतापलेल्या रोहितचं म्हणणं शार्दुल देखील शांतपणे ऐकून घेत होता. 

टीम इंडियाचा न्यूझीलंडला क्लिन स्विप

आगामी वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर खेळवण्यात येत असलेल्या वनडे सिरीजमध्ये टीम इंडिया पास झाल्याचं पहायला मिळतंय. प्रथम श्रीलंका दहन केलं. त्यानंतर आता किंवींचा खात्मा करत टीम इंडियाने आयसीसीच्या रॅकिंगमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आणि सीरिजमध्ये 3-0 ने दणदणीत विजय मिळवला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *