शरद पवारांकडून ठाकरे-शिंदे गटाला दसरा मेळाव्यात मर्यादा पाळण्याचा सल्ला, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांनी…” | Devendra Fadnavis comment on Sharad Pawar suggestion to Thackeray Shinde faction over Dasara Melava | Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News
शरद पवारांकडून ठाकरे-शिंदे गटाला दसरा मेळाव्यात मर्यादा पाळण्याचा सल्ला, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांनी…” | Devendra Fadnavis comment on Sharad Pawar suggestion to Thackeray Shinde faction over Dasara Melava | Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

शरद पवारांकडून ठाकरे-शिंदे गटाला दसरा मेळाव्यात मर्यादा पाळण्याचा सल्ला, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांनी…” | Devendra Fadnavis comment on Sharad Pawar suggestion to Thackeray Shinde faction over Dasara Melavaशिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झालीय. अशातच दोन्ही गटांनी दसरा मेळाव्याची घोषणा करत जय्यत तयारी केली. त्यामुळे दसरा मेळाव्याला दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले होणार असल्याचं दिसतंय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनाही टीका करताना मर्यादा पाळा असा सल्ला दिला. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मंगळवारी (४ ऑक्टोबर) मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, “शरद पवार सल्ला देत आहे हे चांगलं आहे. त्यांनी असे सल्ले देत राहिलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या लोकांनाही असे सल्ले द्यावेत. थोडा अधिकचा सल्ला त्यांनी नाना पटोलेंनाही द्यावा.”

“हे निर्णय भाजपा घेतंय, की शिवसेना हे महत्त्वाचं नाही”

देवेंद्र फडणवीसांनी सर्वाधिक निर्णय भाजपा मंत्र्यांचे घेतले या टीकेलाही उत्तर दिलं. ते म्हणाले, “हे निर्णय भाजपा घेतंय, की शिवसेना घेतंय हे महत्त्वाचं नाही. हे निर्णय शासन घेतं. मंत्रिमंडळात निर्णयासाठी कोणताही विषय येतो, तेव्हा तो विषय मुख्यमंत्री ठेवत असतात आणि मग त्याला कॅबिनेट मान्यता देतं. विरोधकांना निर्णय घ्यायची सवयच नव्हती, आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत.”

“ते फाईलवर बसणारे लोक”

“ते फाईलवर बसणारे लोक होते. त्यामुळे साहजिकच त्यांना त्याचं दुःख होणारच आहे. तीच मळमळ थोडी बाहेर येतेय,” असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

हेही वाचा : दसरा मेळावा, ‘भारत जोडो’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काय संबंध? ; शरद पवार यांचा सवाल

“विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण अशा सर्वच मागास राहिलेल्या भागांना प्रधान्य दिलं जाणार आहे. हे प्राधान्य देताना इतर भागांनाही समतोल प्राधान्य मिळावं असाही आमचा प्रयत्न आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.Source link

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Recent Posts

Datta Jayanti 2022: दत्त जयंती कधी आणि कशी साजरी कराल? जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

Datta Jayanti 2022: हिंदू धर्मात दत्तात्रयांची मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा केली जाते. दत्त जयंती…

46 mins ago

Akshay Kumar: पुन्हा होणार Hera pheri; अक्षयचं ठीक, पण, त्याच्यासोबत हा नवा चेहरा कोण?

Akshay Kumar in hera pheri 3 : बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारच्या  (akshay kumar ) फॅन्ससाठी…

1 hour ago

Viral Video : करिनाकडे पाठ फिरवणाऱ्या करिष्माला पाहून चाहते चिंतेत; सख्ख्या बहिणींमध्ये वादाची ठिणगी?

Manish malhotra Birthday Bash : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या (Manish malhotra ) वाढदिवसानिमित्त एका…

1 hour ago

सुरक्षित पीक, निश्चिंत शेतकरी–प्रधानमंत्री पीक विमा योजना

शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि नफा मिळावा, या दृष्टीने कमी प्रीमियममध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू…

3 hours ago

कायम हसरा चेहरा असणारा Ayushmann Khurrana एकाएकी का झाला भावुक?

An Action Hero: आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) हा बॉलिवूड अभिनेता नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन चित्रपट घेऊन…

3 hours ago

Baba Vanga Prediction : बाबा वेंगांची धडकी भरवणारी भाकितं ऐकून म्हणाल, नवं वर्ष नको रे देवा!

Baba Vanga Prediction : नव्या वर्षाची सुरुवात होत नाही, तोच त्या वर्षाविषयीची अनेक भाकितं सध्या…

4 hours ago