Headlines

मुंबई मनपा निवडणूक : “कोणी सोबत येईल की नाही याचा विचार नको, तयारी करा” शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन | sharad pawar orders ncp activist to be prepared for mumbai municipal corporation election

[ad_1]

बहुमत गमावल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागल्यानंतर राज्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. नगरसेवक तसेच अनेक शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच बंडखोर गटात सामील होत आहेत. असे असताना अनेक शहरांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांना लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी झालेला सत्तासंघर्ष विसरुन सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना कोणी सोबत येईल किंवा नाही, याबाबत विचार करु नका. तयारी करा, असे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा >>> अडीच वर्षांपूर्वीच निर्णय घेतले असते तर, आता ही वेळ आली नसती – मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला!

याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. आज सकाळी अकरा वाजता शऱद पवार आणि मुंबईतील पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात कार्यकर्त्यांना संबोधित केले. “कोणी सोबत येईल की नाही, याचा विचार न करता तयारी करा;” असे निर्देश यावेळी शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले.

हेही वाचा >>> “जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्याचं कारण शरद पवार”; केसरकरांच्या दिल्लीतील आरोपावर राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता शरद पवार यांनी सूत्रं हातात घेतली आहेत. या निवडणुकीसाठी शरद पवार वॉर्ड प्रमुखांकडून वीस दिवसानंतर आढावा घेणार आहेत. त्यानंतरच पुढील रणनीती ठरणार आहे. शरद पवार स्वत: वॉर्डांमध्ये जाऊन प्रचारासाठी कार्यकर्त्यांना भेटण्याचीही शक्यता आहे. आढावा घेतल्यानंतर कोणकोणत्या वॉर्डांमधून राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करायचे? यावर निर्णय होऊ शकतो.

हेही वाचा >>>अतिवृष्टी, वीजबिल ते कृषीपंप पुरवठा, शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा प्लॅन काय? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं; म्हणाले…

दरम्यान, शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडखोरीचा परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरही होणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून मुंबई पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र या बंडखोरीमुळे शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांना मुंबईवरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. तसेच शरद पवार यांनीही राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्यासंदर्भात सूतोवाच केल्यामुळे आगामी काळात मुंबई पालिका निवडणुकीत काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *