Headlines

शंखी गोगलगायीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य सरकारकडून मदतीची घोषणा

[ad_1]

लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायींमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शासनाने तातडीने उपाय योजना करत ९८ कोटी ५८ लाख रूपयांच्या मदतीस मंजूरी दिली आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये पेस्ट अटॅक म्हणजे किटकांचा हल्ला ही अंतर्भूत आहे. त्यानुसार गोगलगायींचा उपद्रव हा पेस्ट अटॅक असल्याने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

हेही वाचा – ठाणे : फाॅक्सकाॅन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे मोदींचे आश्वासन ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून ९८ कोटी ५८ लाख इतका निधी वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्यासंदर्भात अधिसुचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातील NDRF च्या निकषांमध्ये बदल करून दुप्पट दराने मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, याच निर्णयाच्या अनुषंगाने गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात वाढीव दर निर्धारित करण्यात आले आहेत. तीन जिल्ह्यांमधील सुमारे १ लाख १८ हजार ९९६ शेतकऱ्यांना या योजनेतून मदत मिळणार आहे. गोगलगायींमुळे एकूण ७२ हजार ४९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

हेही वाचा – रवी राणांचे आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप; चार पोलिसांच्या आत्महत्येसंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले…

मदत वाटपात संपूर्ण पारदर्शिता बाळगण्यासाठी पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत लाभार्थ्यांना थेट ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासंदर्भात ही सूचना देण्यात आल्या आहेत. गोगलगायींमुळे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीपिके, फळपिकांच्या नुकसानीसाठी ३ हेक्टरपर्यंतही नुकसानभरपाई मिळणार आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *