Shani Rashi parivartan 2022 : येत्या काळात या राशीला शनीची साडेसाती अटळ, कठीण प्रसंगात हे उपाय ठरणार तारणहार


मुंबई : प्रत्येक व्यक्तीचा कोणत्या ना कोणत्या राशीशी संबंध असल्याने या ग्रहांचे राशी बदल होतात. संक्रमणाचा प्रभाव सर्वच राशींवर दिसून येतो. परंतु, राशीचा हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ सिद्ध होतो. 2022 मध्येही अनेक ग्रह आपली राशी बदलणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण शनीची माहिती घेणार आहोत.

शनी, मंगळ, राहू, केतू हे चार ग्रह अमंगलदायी मानले जातात. हे ग्रह ज्या राशीत प्रवेश करतात त्या राशीतील लोकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. मात्र, या चारही ग्रहांपैकी शनी ग्रहाला अधिक धोकादायक मानले जाते. कारण कोणत्याही राशीत शनीने प्रवेश केल्यास तो त्या राशीत साडे सात वर्ष ठाण मांडून बसतो.

शनी अडीच वर्षात राशी बदलतो आणि त्याचा परिणाम किमान ५ राशींवर होतो. ज्या राशीत शनीचा प्रवेश होतो त्या राशीतील लोकांवर शनीच्या वाईट प्रभावाचा परिणाम होतो. 29 एप्रिल 2022 ला शनी आपली राशी बदलत आहे. चला जाणून घेऊ शनि कधी राशी बदलेल आणि कोणत्या राशींवर त्याचा प्रभाव पडेल.

शनीच्या साडेसातीचा एकूण कालावधी साडेसात वर्षांचा आहे, जो तीन चरणांमध्ये विभागला आहे. साडे सातीचा दुसरा टप्पा सर्वात वेदनादायक मानला जातो. शनीचे प्रत्येक पाऊल अडीच वर्ष असते. असे तीन चरण म्हणजे साडे सात वर्ष असते.

ज्या राशीमध्ये शनी प्रवेश करतो. त्या राशीच्या पहिल्या चरणात लोकांना मानसिक समस्या, दुसऱ्या टप्प्यात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्या आढळतात. तर, तिसऱ्या आणि अंतिम चरणात शनिदेवाचा त्रास कमी होतो. कारण या चरणात शनी त्या त्या व्यक्तीला आपली चूक सुधारण्याची संधी देतो. ज्योतिषशास्त्रात शनी हा कर्माचा दाता म्हणजेच कर्मानुसार फळ देणारा मानला जातो. 

29 एप्रिल 2022 ला शनीचा या राशीत प्रवेश

शनी सध्या मकर राशीत आहे. मकर राशीत शनीचे दुसरे चरण आहे. 29 एप्रिल 2022 रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 5 जून रोजी परत मागे जाईल. यानंतर 12 जुलै रोजी पुन्हा मकर राशीत जाईल आणि 17 जानेवारी 2023 पर्यंत येथे राहील.

या राशीला साडेसाती

शनीच्या या राशी बदलाने मीन राशीच्या लोकांवर साडेसाती सुरू होईल. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. तर, कर्क – वृश्चिक राशीच्या लोकांवर शनी धैय्या सुरू होईल.

कुंभ राशीसाठी अडचणी वाढतील

कुंभ राशीच्या साडे सातीचा दुसरा टप्पा मकर राशीतून कुंभ राशीत जाताच सुरु होईल. कुंभ राशीच्या लोकांना सर्व प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणून तुमचे कर्म सुधारा.

या राशींवर धैया सुरू होईल

शनीचा धैय्या अडीच वर्षांचा असतो. 29 एप्रिलला शनीच्या राशीबदलामुळे कर्क, वृश्चिक या दोन राशींवर धैय्या सुरुवात होईल. तर मिथुन, तूळ या राशींना धैय्यापासून मुक्ती मिळेल.

या राशींचे भाग्य खुलणार

धनु राशीच्या ज्या लोकांना गेल्या सात वर्षांपासून समस्यांचा सामना करावा लागत होता त्यांना आता सुखाची अनुभूती मिळेल. धनलाभ, आजारी लोकांना आजारापासून मुक्ती, जीवनात सुख, समृद्धी लाभेल. या राशीच्या लोकांचे नशीब आता त्यांना पूर्ण साथ देईल. लग्नात येणारे अडथळे दूर होतील.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)Source link

Leave a Reply