shambhuraj desai replied to sanjay raut criticism on shivsena party name spb 94कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी काल संजय राऊतांना १०२ दिवसांनंतर पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर तुरुंगातून बाहेर येताच ‘एकच शिवसेना खरी आहे, बाकी सर्व धोतऱ्याच्या कडू बिया’, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. दरम्यान, संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कदाचित १०२ दिवस ते कारागृहात होते, त्यामुळे त्यांना बाहेर घडणाऱ्या गोष्टींची कल्पना नसेन. मात्र, आमच्या पक्षाचे नावच ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “ईडीनं मर्जीच्या आरोपींना अटक केली यात शंका नाही, पण संजय राऊत…”, अंजली दमानियांची टीका!

“आमच्या पक्षाचे नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे आहे. कदाचित १०२ दिवस ते कारागृहात होते. त्यामुळे त्यांना या गोष्टींची कल्पना नसेन. आम्ही शिवसेना सोडलेली नाही किंवा पक्षही फोडला नाही. बहुमतातली शिवसेना ही ‘बाळासाहेबांची शिवसेनाच’ आहे. त्यामुळे संजय राऊत अशी वक्तव्य करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ही त्यांची नेहमीची सवय आहे”, असे प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांना दिले.

हेही वाचा – ‘तुम्ही काय गुंड आहात का? हा हलकटपणा…’, प्रेक्षकांना मारहाण करत चित्रपटगृहाबाहेर काढलं जात असल्याने शरद पोंक्षे संतापले

“आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आम्ही बाळासाहेंबाची भूमिका घेऊनच पुढे जात आहोत. मात्र, ही वेळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर का आली हे तीन महिन्यात उद्धव ठाकरेंना समजले असेल. केवळ संजय राऊत यांच्यामुळेच ४० आमदार आणि १२ खासदारांनी अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यामुळे आता संजय राऊतांचे किती ऐकायचं हे आता उद्धव ठाकरेंनी ठरवण्याची गरज आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – साताऱ्यात अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात, प्रतापगडाच्या पायथ्याशी चोख बंदोबस्त

दरम्यान, काल १०२ दिवसांनंतर पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांना जामीन मंजूर केला. संजय राऊतांना तीन महिन्यांपूर्वी कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. मात्र, काल आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. “१०० दिवसानंतर बाहेर आलो आहे, बाहेर काय चाललं याची माहिती मिळत नव्हती. शिवसेनेचा कणा मोडलेला नाही. मी लढणारा शिवसैनिक असून, आख्ख आयुष्य बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंबरोबर गेलं आहे. एकच शिवसेना खरी आहे, ती बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील, बाकी सर्व धोतऱ्याच्या कडू बिया आहेत. हा महाराष्ट्र आणि मुंबई कोणाच्या मागे उभी आहे कळेल,” असे ते म्हणाले होते.Source link

Leave a Reply