शाहरुखच्या घरात रहायचंय? घरातल्या सगळ्यांची Saving सुद्धा कमी पडेल


Shah Rukh Khan Mannat One Room Rent: संपूर्ण जगात असणाऱ्या सेलिब्रिटींच्या घरांमध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या ‘मन्नत’ या निवासस्थानाचाही समावेश आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकासाठी शाहरुखचं घर म्हणजे कुतूहलाचा विषय. 

बॉलिवूडमधील या किंग खानचं घर, हे कोणा एका आलिशान महालाहून कमी नाही. किंबहुना तुम्ही विचारही केला असेल ना, एखादा दिवस इथं राहायला मिळालं तर? 
 
खरी गंमत तर इथे आहे. कारण, शाहरुखच्या घरातील एका खोलीत राहण्याचा विचार तुम्ही करत असाल तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाची आर्थिक साठवणही कमीच पडेल. कारण किंग खानच्या घरातील एका खोलीची किंमत कोट्यवधींमध्ये असू शकते.  

खुद्द शाहरुखनंच एका चॅटिंग सेशनमध्ये यावर वक्तव्य केलं होतं. ‘सर मन्नतमध्ये एक रुम भाड्यानं हवा आहे, किती पैसे लागतील?’ असा प्रश्न त्याला या सेशनदरम्यान एका चाहत्यानं विचारला. 

शाहरुखनं अतिशय हुशारीनं या प्रश्नाचं उत्तर देत, पैसे न सांगता यासाठी तिला 30 वर्षांची मेहनत लागेल; असं तो म्हणाला. त्याचं हे एका ओळीतलं उत्तर बरंच बोलकं होतं. 

बॉलिवूडमध्ये कारकिर्द सुरु झाल्या क्षणापासून शाहरुखनं मेहनत केली आणि तो या यशशिखरावर पोहोचला. हे घर शाहरुखसाठी फक्त एक इमारत नसून, त्याच्या स्वप्नपूर्तीची साक्ष देणारी एक वास्तू आहे. 2001 मध्ये त्यानं 13.32 कोटी रुपयांना मन्नत खरेदी केला होता. आज त्याची किंमत 200 कोटींच्याही पलीकडे आहे. 

‘मन्नत’ एक थर्ड हेरिटेज स्ट्रक्चर असणारं घर आहे. 1920 मध्ये ते उभारण्यात आलं होतं. तेव्हा या घराचं नाव विला विएना असं होतं. शाहरुखनं ते खरेदी केलं आणि तेव्हापासून त्याची ओळख झाली, ‘मन्नत’. Source link

Leave a Reply