शाहिद कपूरच्या पत्नीचं धक्कादायक वक्तव्य म्हणाली, ‘या’ अभिनेत्यासोबत ठेवलेत कारमध्ये शारिरीक संबध…


मुंबई : शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत. 7 जुलै 2015 रोजी त्यांनी गुडगावमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केलं. मीरा वयाने शाहिदपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे, पण लोकांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडते.

लग्नाच्या जवळपास दोन वर्षानंतर जेव्हा शाहिद आणि मीरा ‘कॉफी विथ करण’चा भाग होते. तेव्हा मीराने कारमध्ये शारिरीक संबध ठेवल्याचं  मान्य केलं होतं. मीराचं हे बोलणं ऐकून खुद्द शाहिदही थक्क झाला.  आज आम्ही तुम्हाला ‘कॉफी विथ करण’मध्‍ये काय घडलं होतं या बद्दल संपूर्ण घटना सांगणार आहोत…

एपिसोड दरम्यान करण जोहरने मीरा आणि शाहिदला विचारलं की, त्यांनी कधी कार सेक्स केला आहे का? उत्तरात मीरा म्हणाली, होय,  पण यावेळी शाहिदची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. त्यानेही आश्चर्याने विचारलं, “हे कधी झालं?”

संभाषणात पुढे, जेव्हा करणने शाहिद आणि मीराला त्यांच्या बेडरूमच्या रहस्यांबद्दल विचारलं तेव्हा शाहिदने कबूल केलं की ते अनेकदा घरात नग्न झोपतात. यानंतर करणला शाहिद आणि मीराच्या लव्ह लाईफबद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं. मीराने शाहिदच्या या खुलाशाला सहमती दर्शवत म्हटलं की, “तुम्ही झोपता तेव्हा आरामात असायला हवं.”

नंतर जेव्हा करण मीराला विचारतो की, त्यांचं लग्न तुटण्याचं कारण काय असू शकतं, मग ती फसवणूक असो, सासरची ढवळाढवळ असो, वाईट लैंगिक संबंध असो किंवा एकमेकांचा कंटाळा असो. मीराने उत्तर देताना सांगितलं की, तिच्या सासरच्या घरात कोणताही हस्तक्षेप नाही, सेक्स वाईट नाही आणि कंटाळाही नाही. त्यामुळे फसवणूक हाच पर्याय उरतो.Source link

Leave a Reply