Headlines

भाकपाचे जेष्ठ नेते कॉम्रेड शंकर कदम यांचे निधन

बार्शी /प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बार्शी तालुक्यातील ज्येष्ठ नेते कॉम्रेड शंकर कदम उर्फ बापू वय 85 यांचे आजारपणाने 19 ऑक्टोबर 2021 रोजी श्रीपत पिंपरी येथील त्यांच्या निवास्थानी दुःखद निधन झाले.त्यांना पत्नी, चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शंकर बापू हे आयुष्यभर मार्क्सवादी विचारांनी प्रेरित होऊन कामगार, शेतकरी, विद्यार्थी एकजुटीसाठी काम करीत राहिले, शेतकरी कामगार पक्षाचे कॉम्रेड शाहीर फाटे यांच्या कलापथकात ते अग्रभागी होते तसेच वैराग येथील गोळीबार आंदोलनाच्या दरम्यान अग्रभागी राहिले होते. तरुणांनी वाचन करून समतेच्या लढाईत सहभाग नोंदवावा यासाठी त्यांनी बार्शी तालुक्यातील श्रीपतपिंपरी या गावी शहिद भगतसिंग वाचनालय स्थापन केले होते.

आपली संपूर्ण हयात शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या विविध मागण्यांवर ते मोर्चे , आंदोलने सहभागी झाले होते. विद्यार्थी चळवळीत आंदोलनात देखील ते सहभाग घेत होते. श्रीपतपिंपरी येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शाखा स्थापन व्हावी तसेच अखिल भारतीय किसान सभेचे काम पुढे जावे यासाठी ते प्रयत्नशील राहिले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मध्ये काम करत असताना कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील, कॉम्रेड अमर शेख, कॉम्रेड माधराव गायकवाड यांच्याशी संबंध आल्याचे ते बोलत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *