Headlines

Security Tips: या कारणांमुळे लीक होतो फोनचा डेटा, या चुका टाळाच

[ad_1]

नवी दिल्ली: Data Safety: आजकाल डेटा लीकच्या घटना देखील वारंवार ऐकण्यात येत असतात. अनेक प्रकारे डेटा लीक होत आहे. कधी फेसबुकचा डेटा लीक होतो तर कधी कोणत्यातरी शॉपिंग साइटचा. एवढेच नाही, तर तुमच्या स्मार्टफोनचा खाजगी डेटा जसे की फोटो, व्हिडिओ किंवा कोणतीही गोपनीय फाइल देखील लीक होऊ शकतो. याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे डेटा लीक झाल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती आणि ई-मेल आयडी, पासवर्ड, मोबाइल नंबर इत्यादी हॅकर्सपर्यंत पोहोचतात.

वाचा: या ऑफरचा धुमाकूळ ! MRP पेक्षा २५ हजारांनी स्वस्त मिळतोय iPhone

नंतर हॅकर्स फोरमसारख्या डार्क वेबवर डेटा विकला जातो किंवा याच्या मदतीने वैयक्तिक ब्लॅकमेलही करता येते. . तुम्हीही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल तर तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणतीही अप्रिय घटना टाळता येईल. चला जाणून घेऊया.

या कारणांमुळे डेटा लीक होतो

कोणत्या चुकांमुळे तुमचा वैयक्तिक डेटा लीक होतो हे माहित असणे महत्वाचे आहे. अनेकदा असे दिसून येते की, आपण आपले कोणतेही वैयक्तिक फोटो, व्हिडिओ किंवा फाइल्स आणि पासवर्ड आपल्या मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करतो. जर त्यांनी तुमचा डेटा आणखी एखाद्या व्यक्तीकडे हस्तांतरित केला तर तुमचा डेटा लीक होऊ शकतो.

वाचा: DigiLocker मध्ये PAN-Aadhar-DL करा सेव्ह, नेहमी सोबत कॅरी करण्याची नाही पडणार गरज

तसेच, बर्‍याच वेळा आम्ही घाईघाईने किंवा लक्ष न देता प्रामाणिक स्त्रोतांकडून Third Party Apps इन्स्टॉल करणे टाळावे. यामुळे अॅप्स स्पायवेअरने लोड केले जाऊ शकतात आणि तुमची वैयक्तिक माहिती हॅकर्सच्या समोर आणू शकतात.

डेटा लीक टाळण्यासाठी या पद्धती फॉलो करा

तुमच्या स्मार्टफोनला डेटा लीकपासून वाचवण्याचा सर्वात सोपा आणि महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुमचा फोन लॉक ठेवणे. यासोबतच अॅपलॉकच्या मदतीने फोनमधील अॅप्स विशेषतः गॅलरी आणि फाइल मॅनेजर सुरक्षित ठेवा. अॅप फक्त Google Play Store वरून इंस्टॉल करा. तसेच, अॅप स्थापित करण्यापूर्वी, त्याचे रेटिंग आणि रिव्ह्यू नक्की वाचा

थर्ड पार्टी अॅप्स वापरणे टाळा. बर्‍याच वेळा या अॅप्समध्ये स्पायवेअर आणि मालवेअर असतात, जे तुमचा फोन स्कॅन करत राहतात आणि तुमची वैयक्तिक माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी बॅकग्राउंडमध्ये काम करतात. फोनमध्ये फक्त आवश्यक अॅप इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा शंका असेल तेव्हा लगेच अॅप काढून टाका.

फोनवरील कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. हॅकर्स किंवा स्कॅमर अनेकदा ईमेल किंवा एसएमएसद्वारे मालवेअरने भरलेल्या लिंक्स पाठवतात. लिंक क्लिक करताच तुमच्या फोनची हेरगिरी सुरू होते.

वाचा: Black Friday सेलमध्ये या भन्नाट स्मार्टफोनची किंमत झाली ११,००० रुपयांपेक्षा कमी, फोनचे फीचर्स लय भारी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *