Headlines

स्कोअर बोर्डवर विक्रमी धावसंख्या लावून सुद्धा ‘हा’ खेळाडू होतोय ट्रोल

[ad_1]

मुंबई : क्रिकेटविश्वात शुक्रवारी एक अनोखा विक्रम रचला गेला. इंग्लंडने 498 धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारत हा रेकॉर्ड केला. या रेक़ॉर्डची क्रिकेटविश्वात प्रशंसा होत आहे. मात्र ही प्रशंसा होत असताना एका खेळाडूवर मात्र टीकांचा वर्षाव होतोय. हा खेळाडू नेमका कोण आहे? आणि हे प्रकरण काय आहेत ते जाणून घेऊयात.   

नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने 498 धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. यादरम्यान इंग्लंडचे फलंदाज फिल सॉल्ट, डेव्हिड मलान आणि जोस बटलर यांनी शतके झळकावली. मात्र, संघाचा कर्णधार इऑन मॉर्गन फार काही करू शकला नाही आणि गोल्डन डकवर (पहिल्या चेंडूवर) बाद झाला. मॉर्गनला पीटर सीलरने एलबीडब्ल्यू आऊट केले.

गोल्डन डकचा शिकार 
इऑन मॉर्गनची वनडे सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची ही सातवी वेळ आहे.तो खाते न उघडता पहिल्याच चेंडूवर बाद झाला. शून्यावर बाद झाल्यानंतर मॉर्गनला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.

सोशल मीडियावर ट्रोल 
इऑन मॉर्गनच्या त्या खेळीवर तो खुप ट्रोल होतोय. एक ट्विटर युझर लिहतो, ‘इऑन मॉर्गन लंगर मध्येही भूखा राहीला’. म्हणजेच इंग्लंडचे सर्वच खेळाडू धावांची भूक भागवताना, मॉर्गन भूका राहीला.

भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनेही मॉर्गनला ट्रोल करण्यासाठी मीमचा आधार घेतला. जाफरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सेम एनर्जी आणि एक फोटो पोस्ट केला आहे.  

कसा रंगला सामना

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 4 गड्यांच्या मोबदल्यात 498 धावा केल्या. जोस बटलरने अवघ्या 70 चेंडूंत सात चौकार आणि 14 षटकारांच्या मदतीने नाबाद 162 धावांची खेळी केली. तर डेव्हिड मलानने 125 आणि सॉल्टने 122 धावांचे योगदान दिले. लियाम लिव्हिंगस्टोननेही संधीचा चांगला फायदा घेत 22 चेंडूत 6 षटकार आणि तब्बल 6 चौकारांसह 66 धावा केल्या. नेदरलँड्सकडून कर्णधार पीटर सीलरने सर्वाधिक दोन बळी घेतले.

प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 49.4 षटकांत 266 धावांवर गारद झाला आणि 232 धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. नेदरलँड्सकडून स्कॉट एडवर्ड्सने नाबाद 72 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक तीन खेळाडूंना बाद केले. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *