Headlines

SBI च्या ‘या’ योजनेत एकदा पैसे जमा करा, दरमहा व्याजासह मोठी कमाई

[ad_1]

मुंबई : SBI Scheme : तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हासाठी SBIची एक चांगली योजना आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास निश्चित उत्पन्नासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. एसबीआय अ‍ॅन्युइटी स्कीममधील (SBI Scheme) गुंतवणुकीद्वारे तुम्ही दरमहा कमाई करू शकता.

भविष्यातील गुंतवणुकीसाठी अनेक लोक पैसे गुंतवतात. मात्र, काहीवेळा चुकीची गुंतवणूक त्रासदायक ठरते. तसेच कधीकधी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्याने फायदा होण्यापेक्षा समस्या वाढतात. अशा परिस्थितीत, आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला कोणतीही समस्या येऊ नये. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी वार्षिकी योजना आणली आहे.

SBIच्या या योजनेची वैशिष्ट्ये

1- एसबीआयच्या सर्व शाखांमधून अ‍ॅन्युइटी स्कीममध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.
2- वार्षिकी योजनेत किमान 25 हजार रुपये करावे लागतील.
3- SBI कर्मचारी आणि माजी कर्मचाऱ्यांना 1 टक्के अधिक व्याज मिळेल.
4- ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के अधिक व्याज दिले जाईल.
5- या योजनेवर मुदत ठेवीचे व्याज दर देखील लागू होतील.
6- ठेवीनंतरच्या महिन्यापासून देय तारखेला व्याज रक्कम दिली जाईल
7- टीडीएस कापल्यानंतर बचत खात्यात किंवा चालू खात्यात व्याज रक्कम जमा होईल.
8- एकरकमी रकमेवर चांगला परतावा मिळविण्यासाठी एक चांगली योजना आहे.
9- विशेष परिस्थितीत, अ‍ॅन्युइटीच्या शिल्लक रकमेच्या 75 टक्क्यापर्यंत ओव्हरड्राफ्ट किंवा कर्ज मिळू शकते.
10- अ‍ॅन्युइटी योजनेत बचत खाते चांगले परतावा देते.

SBI ची वार्षिक योजना उत्तम 

SBI च्या या योजनेत 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येईल. यामध्ये गुंतवणुकीवरील व्याजदर निवडलेल्या कालावधीच्या मुदत ठेवींप्रमाणेच असेल. समजा, जर तुम्ही पाच वर्षांसाठी निधी जमा केला, तर तुम्हाला पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर लागू असलेल्या व्याजदरावर व्याज मिळेल. भारतातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

दरमहा 10 हजार हवे तर किती पैसे गुंतवायचे?

जर एखाद्या गुंतवणूकदाराला दरमहा 10 हजार रुपये मासिक उत्पन्न हवे असेल, तर त्यासाठी गुंतवणूकदाराला 5 लाख 7 हजार 965 रुपये आणि 93 पैसे जमा करावे लागतील. तुम्हाला जमा केलेल्या रकमेवर 7 टक्के व्याज दराने परतावा मिळेल. ज्यामुळे गुंतवणूकदार दरमहा सुमारे 10 हजार रुपये मिळतील. त्यामुळे जर तुमच्याकडे एकरकमी रक्कम असेल तर अजिबात उशीर करु नका.

 गुंतवणूक करायची असल्यास नियम जाणून घ्या

SBI च्या अ‍ॅन्युइटी स्कीममध्ये दरमहा किमान 1000 रुपये जमा करण्याचा नियम आहे. परंतु जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. अ‍ॅन्युइटी पेमेंटमध्ये, ग्राहकाने जमा केलेल्या रकमेवर व्याज आकारून ठराविक वेळेनंतर उत्पन्न सुरू होते. या योजना भविष्यासाठी खूप छान आहेत, पण मध्यमवर्गीयांना इतके पैसे एकत्र जमणे शक्य नाही.

वार्षिक ठेव योजना vs आवर्ती ठेव

सामान्यतः मध्यमवर्गीय लोकांकडे एकरकमी रक्कम नसते. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक आवर्ती ठेवीमध्ये गुंतवणूक करून त्यांचे भविष्य सुरक्षित करु शकतात. आरडीमध्ये, लहान बचतीद्वारे रक्कम गोळा केली जाते आणि नंतर त्यावर व्याज लागू करून गुंतवणूकदारांना परत केली जाते. यामुळे, अ‍ॅन्युइटी योजनेच्या तुलनेत आवर्ती ठेव सामान्य लोकांमध्ये जास्त पसंत केली जात आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *