Headlines

सवतीसोबत रवीना टंडनचं गैरवर्तन; हे कितपत योग्य?

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन 90 च्या दशकात पडद्यावर सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांसोबतच रवीनाने तिच्या कॅट फाईटमधूनही खूप नाव कमावलं आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला रवीनाच्‍या कॅट फाईटचा किस्सा सांगणार आहोत, जो तुम्ही याआधी कधीच ऐकला नसेल.

खरंतर, रवीनाची ही कॅट फाईट कोणत्याही अभिनेत्रीसोबत नाही तर तिच्या बहिणीसोबत घडली आहे. रवीना टंडनने तिचा पती अनिल थडानीची एक्स पत्नी नताशा सिप्पीच्या डोक्यावर दारूने भरलेला ग्लास ओतला होता. तोही सगळ्यांसमोर. रवीना टंडनने 22 जानेवारी 2004 रोजी उदयपूरमध्ये फिल्म डिस्ट्रीब्यूटर अनिल थडानीसोबत शाही विवाह केला होता.

2003 मध्ये रवीना टंडनच्या वाढदिवसानिमित्त अनिलने तिला लग्नासाठी प्रपोज केलं होतं आणि रवीनाने ‘हो’ म्हटलं होतं. त्यानंतर नोव्हेंबर 2004 मध्ये दोघांनी लग्न केलं. रवीनाचे हे पहिले लग्न आहे पण अनिल थडानीचं हे दुसरं लग्न आहे.

अनिलचं पहिलं लग्न नताशा सिप्पीसोबत झालं होतं, मात्र काही काळानंतर अनिलचे नताशासोबतचे लग्न तुटलं आणि सिप्पी कुटुंबाने रवीना टंडनवर मुलीचं घर फोडल्याचा आरोप केला.

अनिलसोबत लग्न झाल्यानंतर रवीना कधीही नताशाला भेटली नाही. असं म्हटलं जातं. पण लग्नाच्या दोन वर्षानंतर रवीना, अनिल थडानी आणि नताशा सिप्पी एकाच छताखाली भेटले. वास्तविक, 2006 मध्ये फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी न्यू ईयर निमित्ताने एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत फिल्म इंडस्ट्रीतील अनेक बडे स्टार्स उपस्थित होते.

रवीना पती अनिल थडानीसोबत पोहोचली होती. तर नताशा सिप्पीही पार्टीची गेस्ट म्हणून आली होती. पार्टीत उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, नताशा सिप्पी वारंवार पार्टीत तिचा एक्स पती अनिल थडानीचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होती. त्याचबरोबर रवीना अनिलसाठी जेवण आणण्यासाठी गेली तेव्हा संधी पाहून नताशा अनिलकडे पोहोचली.

ती वारंवार अनिलच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. नताशा अनिलचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना रवीनाने पाहिल्यावर तिचा पार चढला. असं म्हटलं जातं की. तिने नताशाला तिथून जाण्यास सांगितलं पण नताशा राजी झाली नाही. त्यानंतर रवीनाने रागाने नताशाच्या डोक्यावर वाइनने भरलेला ग्लास ओतला. एवढचं नव्हेतर तिने तिच्यावर ग्लासही फेकून मारला.  यादरम्यान रवीनाने नताशालाही शिवीगाळही केली. दोन सवतींमधील हा वाद अनेक दिवस चर्चेत होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *