साठी ओलांडलेल्या अभिनेत्रीचा सर्वात बोल्ड लूक; टकामका पाहणाऱ्यांना ‘ती’ म्हणते…


मुंबई : अभिनेत्री म्हटलं, की त्यांच्या नावाभोवती असणारं वलय आणि त्यात वावरणारे हे कलाकार यांच्याबाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही. येणारा प्रत्येक ट्रेंड ही मंडळी प्रचंड कमालीनं हाताळतात आणि त्यातच अधिक सहजपणे वावरत असतात. 

अनेकदा होतं असं की, याच कलाकारांना विशेष म्हणजे अभिनेत्रींना ट्रोलिंगचा शिकार व्हावं लागतं. हे ट्रोलिंग असतं त्यांच्या कपडे घालण्याच्या पद्धतीवरुन किंवा त्यांच्या निवडीवरुन. 

तोकडे कपडे घातले म्हणून ही अभिनेत्री अशीच, ती तशीच अशी अनेक मतं आपण मांडत सुटतो. पण, कपड्यांवरून व्यक्तीबद्दल अंदाज बांधणं कितपत योग्य आहे? (Bollywood Actress Neena Gupta)

समोरच्या व्यक्तीऐवजी स्वत:ला त्या ठिकाणी ठेवून याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? अभिनेत्री नीना गुप्ता यांनी समाजाच्या डोळ्यावर चढलेली हीच अंदाज बांधण्याची पट्टी सोडण्याचा प्रयत्न केला आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यामध्ये नीना गुप्ता यांनी आपण हा व्हिडीओ नेमका का शेअर करत आहोत यामागचं कारण स्पष्ट केलं. 

‘मला हे यासाठी शेअर करावं लागत आहे कारण जी लोकं सेक्सी कपडे घालतात, जसे मी आता घातले आहेत तेव्हा इतरांच्या मते ही लोकं अशीच वायफळ असतात. 

पण, मी एक सांगू इच्छिते की मी संस्कृतमध्ये MPhil केलं आहे. आणिहीखूप काही केलंय. कपडे पाहून कोणाला गृहित धरु नका… खिल्ली उडवणाऱ्यांनो… हे लक्षात ठोवा’, असं त्या या व्हिडीओमध्ये म्हणाल्या. 

स्ट्रीप असणारा लो नेक टॉप घालणाऱ्या नीना गुप्ता यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करत अतिशय मोजक्या शब्दांमध्ये ज्यांना जे सुनवायचं होतं, ते तितक्याच प्रत्ययकारीपणे सुनावलं.

इथे मुद्दा असा, की कोणत्याही व्यक्तीला न ओळखता, पारखता त्याच्याबाबतचे अंदाज बांधण्याची सवय ही कायम व्यर्थ, हीच बाब त्यांना अधोरेखित करायची होती. Source link

Leave a Reply