सासरी मिळुदे तुला माहेराची माया…; लग्नमंडपात गहिवरली हृता, आईलाही अश्रू अनावर


मुंबई : मराठी मालिका विश्वात अतिशय गाजलेली आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. यावेळी मात्र ती चर्चेत असण्यास कारण ठरतंय ते म्हणजे तिचं लग्न. मालिकेमुळे नव्हे तर, विवाहसोहळ्यामुळे चर्चेत असणाऱ्या हृतानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले. 

दिग्दर्शक प्रतीक शाह याच्याशी तिनं लग्नगाठ बांधली. अतिशय मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हृतानं प्रतीकशी लग्नगाठ बांधली आणि सोशल मीडियावरून तिच्यावर शुभेच्छांची बरसात झाली. 

तिच्या फोटोंवर चाहते कमेंट करत नाही, तोच आणखी एका अकाऊंटवरून तिच्या लग्नातील व्हिडीओ समोर आला. जो सर्वांनाच भावूक करुन गेला. (actress hruta durgules emotional video from her wedding with prateek shah)

हृताच्या लग्नाच तिच्या मेकअपची आणि हेअरस्टायलिंगची जबाबदारी असणाऱ्या निशी गोडबोले आणि त्यांच्या टीमनं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला. 

व्हिडीओमध्ये हृता लग्नमंडपात येताना दिसत आहे. प्रत्येक नववधूच्या मनात असणारे भाव यावेळी तिच्याही मनात घर करुन गेले होते. हृताच्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचं नान घेत नव्हते. 

चेहऱ्यावर हसू होतं, पण मनातून मात्र तिला गहिवरून आलं होतं. लाडक्या लेकिला लहानाची मोठी केली पण, आता काही क्षणांनीच तिची पाठवणी करायची या भावनेनं हृताच्या आई- बाबांनाही भावना आवरता आल्या नाहीत. 

काहीही न बोलतासवरताही हा व्हिडीओ त्याच्या भावनांवाटे बरंच काही बोलून गेला हेच इथं पाहायला मिळत आहे. 

हृताचा व्हिडीओ पाहताना, माहेर सोडून सासरी गेलेल्या अनेक सासरवाशिणींनाही क्षणार्धात त्यांची माय आठवेल असं म्हणायला हरकत नाही. Source link

Leave a Reply