सर्वांनाच बसला धक्का, जेव्हा Andrew Symonds ने ‘या’ अभिनेत्रीला केलं प्रपोज, पण…


मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला. अँड्र्यूच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजण त्याच्या आठवणींना उजाळा देतायत. तो आता आपल्यात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का अँड्र्यू सायमंड्सने भारतातील एका अभिनेत्रीला प्रपोज केलं होतं.

 2011 मध्ये बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये अँड्र्यू सायमंड्स दोन आठवड्यांसाठी खास पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. यादरम्यान शोमध्ये त्याची बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीशी त्याची खास मैत्री झाली होती. या शोमध्ये जुही परमार, मेहक चहल, पूजा मिश्रा, शोनाली नागराणी, श्रद्धा शर्मा, पूजा बेदी या अभिनेत्रीही स्पर्धक म्हणून होत्या. 

शोमध्ये अभिनेत्रीला केलं प्रपोज

बिग बॉस 5 मध्ये अँड्र्यू सायमंड्सने एका टास्क दरम्यान पूजा मिश्रा आणि शोनाली नागराणी यांना प्रपोज केलं होतं. त्याच्यामुळे हा सीझन चांगलाच फेमस झाला होता. क्रिकेटरने बिग बॉसच्या घरात 11 दिवस घालवले होते. हा शो संपल्यानंतर त्याने आपला अनुभव लोकांना सांगितला होता.

यादरम्यान, त्याला बिग बॉसच्या घरात इंग्रजी बोलण्याची परवानगी देखील देण्यात आली होती, ते शोच्या नियमांच्या विरोधात होतं.

बिग बॉस 5 मध्ये दिसलेला अँड्र्यू सायमंड्स देखील यावेळी बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीसोबत खास बॉन्ड दिसला होता. बिग बॉसनंतर अँड्र्यू सायमंड्स ‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’मध्येही दिसला होता. यादरम्यान त्याने बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूसोबत स्टेजवर एक दमदार परफॉर्मन्स दिला होता.

अँड्र्यू सायमंड्सचं कार अपघातात निधन झालं. शनिवारी रात्री उशिरा कार अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांच्या टीमला त्याचे प्राण वाचवण्यात यश मिळालं नाही. त्याच्या निधनानं क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.Source link

Leave a Reply