Headlines

सरपंच परिषदेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांचा वाढदिवस महिला दिन म्हणून साजरा

सोलापूर- सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील आदर्श व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन विभागाचे चंचल पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग शेळकंदे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी चंचल पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला तसेच श्री शेळकंदे यांचेही सरपंच परिषदेच्या वतीने स्वागतपर सन्मान केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच परिषदेच्या प्रदेश सरचिटणीस अँड. विकास जाधव होते यावेळी जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख,महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा पार पडला.

यावेळी शेळकंदे यांनी आपल्या मनोगतात ग्रामपंचायतचे पदाधिकारी व अधिकारी ग्रामविकासाची दोन चाके आहेत हे दोन्ही चाके बरोबर चालायला हवी यापैकी कोणतेही चाक झीजणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी मनोगतात व्यक्त केली.चंचल पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत काम करत असताना सरपंच परिषदेचे गावाच्या विकासासाठी सातत्याने सहकार्य लाभत आहे महिला सरपंचांना सरपंच परिषदेने व्यासपीठ मिळवून दिलेले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या वतीने सरपंच परिषदेचे अभिनंदन करत असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले तसेच मागील पाच वर्षाची महिला दिनानिमित्त आदर्श महिला सरपंचांच्या सत्काराची परंपरा चालू आहे मागील वर्षीपासून वाढदिवस व महिला दिन एकाच दिवशी साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली त्याबद्दल सरपंच परिषदेचे पदाधिकारी यांचे कौतुक केले

कौसर तय्यब जहागीरदार , चैताली नागनाथ गोटे आंधळकर , ज्योत्स्ना सोपान पाटील , डॉ प्रियंका गणेश खरात, स्वाती शिवाजी शेंडगे, ज्योती राजेंद्र कुलकर्णी, रजनी मगन कंसुरवसे, शुभांगी लचके, रूपाली नवले यांचा महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण विकासातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.

सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲड विकास जाधव यांनी सरपंच परिषदेने राज्यभर महिलांना व्यासपीठ मिळवून दिले तथापि स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्क्यापेक्षा जास्त महिला असलेले राज्यस्तरापासून ते तालुका स्तरापर्यंत स्वतंत्र महिला विन स्थापन केलेली आहे त्या माध्यमातून महिलांचा मान व सन्मान वाढवण्यासाठी सरपंच परिषद कटिबद्ध आहे केवळ महिला दिनाचे औचित्य साधून व महिलांना हार भेटी देऊन तात्पुरता सन्मान करण्याऐवजी महिलांचा त्यांच्या कार्यात सहभाग घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांना केवळ महिला दिनी नाही तर दररोज सन्मान देण्याची गरज आहे असे आपल्या मनोगतातून सांगितले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात जिल्हा समन्वयक अजित बारंगुळे यांनीही मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख यांनी केले तर आभार महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील यांनी मानले सूत्रसंचालन अँड धनाजी बागल यांनी केले उपस्थितांचे स्वागत पंडित ढवण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *