Headlines

Sara Tendulkar च्या जन्मानंतर आई अंजलीला करावा लागला मोठा त्याग

[ad_1]

मुंबई : सचिन तेंडुलकर हे नाव कोण ओळखत नाही? त्याचे नाव क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांमध्ये घेतलं जातं. एवढंच काय तर त्याला क्रिकेटचा देव देखील म्हटलं जातं. सचिनला या सगळ्यात साथ मिळाली ती त्याची बायको अंजलीची. तिने एकीकडे सचिनचं घर सांभाळं, ज्यामुळे सचिनला कधीही आपल्या  घराची काळजी करायला लागली नाही. त्यामुळे तो आपल्या करिअर आणि खेळावर लक्ष केंद्रित करु शकला.

अमेरिकन पत्रकार ग्रॅहम बेन्सिंगर यांच्याशी नुकत्याच झालेल्या संवादादरम्यान त्यांनी सचिनसोबत क्रिकेटसह इतर विषयांवरही चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या कौटुंबिक जीवनाविषयीही सांगितले.

त्यावेळी आपली मुलगी सारा तेंडुलकरच्या जन्मानंतर पत्नी अंजलीला मोठा त्याग करावा लागला असे सचिनने त्या मुलाखतीत सांगितले. ग्रॅहम बेन्सिंगर सचिनला म्हणाले, “मी तुझा चित्रपट पाहिला. त्या सिनेमात तुमची बायको म्हणते की तुमच्यासाठी क्रिकेट नंबर वन आणि फॅमिली दुसऱ्या क्रमांकावर आहे, ते बरोबर आहे का?”

यावर सचिन हसला आणि म्हणाला, “मला प्रामाणिकपणे सांगायचे आहे की, कुटुंब महत्त्वाचे आहे आणि तेच सर्वात महत्त्वाचे आहे. क्रिकेट हे माझ्या कुटुंबामुळे आहे आणि अंजलीमुळे माझं कुटुंब आहे, त्यामुळे माझ्यासाठी ती पहिली आहे यात शंका नाही.”

तुमच्या करिअरमध्ये तुमच्या पत्नीची भूमिका काय आहे, असे सचिनला विचारल्यावर तो म्हणाला, “मी जे काही बोलेन ते पुरेसे होणार नाही. मी अंजलीला 1990 मध्ये भेटलो. तेव्हापासून हा माझ्यासाठी खूप चांगला प्रवास आहे.”

सचिन म्हणाला, ‘ती (अंजली) सुवर्णपदक विजेती डॉक्टर आहे. लग्नानंतरही तिला आपला व्यवसाय चालू ठेवता आला. तिलाही तसे करायचे होते, पण एका प्रसंगी, जेव्हा साराचा जन्म झाला तेव्हा तिने करिअर सोडण्याचा कठीण निर्णय घेतला.

सचिन म्हणाला, “अंजली म्हणाली की तू पण प्रवास करत राहा. कुणाला तरी मुलांसोबत राहावं लागतं. मग अंजलीने या विषयावर बोलण्यासाठी पुढाकार घेतला आणि मी मुलांसोबत वेळ घालवणार असे तिने मला सांगितले.”

तेंडुलकर म्हणाला, “अंजलीने मला सांगितले की, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कोणीतरी नेहमी त्यांच्यासोबत असायला हवं, पण तु भारतासाठी खेळ. आपल्याकडे पर्याय नाही, तुला जावं लागेल. इथे चेंडू माझ्या कोर्टात आहे आणि मी ते करीन.”

म्हणजेच मुलीच्या जन्मानंतर अंजली तेंडूलकरने आपलं करिअर सोडलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, अंजली तेंडूलकर ही डॉक्टर आहे. परंतु साराच्या जन्मानंतर तिने आपल्या करिअरचा त्याग केला आणि ती घरीच राहून मुलांना सांभाळू लागली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *