Headlines

सारा भाभी जैसी हो…; Shubman Gill ला पाहताच स्टेडियममध्येच चाहत्यांची नारेबाजी

[ad_1]

Shubman Gill Teased By Sara Name : भविष्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज म्हणून सध्या शुभमन गिलकडे (Shubman Gill) पाहिलं जातंय. मंगळवारी इंदूरमध्ये झालेल्या सामन्यात त्याने शतक (Shubman Gill century) झळकावलं. दरम्यान तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात शुभमन गिल आणि फॅन्स (Fans Teased) यांच्यामध्ये एक घटना घडली. यावेळी स्टेडियममध्ये बसलेले चाहते शुभमनला ‘सारा भाभी-सारा भाभी’ (Sara Tendulkar) असे चिडवत होते. हे चिडवताना शुभमन गिलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral Video) झाला आहे.  

भर स्टेडियममध्ये साराच्या नावाने शुभमनला चिडवलं (Shubman Gill Teased By Sara Name)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हीडिओमध्ये चाहते म्हणतायत की,  ‘हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो’. शुभमन गिलला साराच्या नावाने डिवचण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. चाहते सुभमनला साराच्या नावाने चिडवण्याची एक संधी सोडत नाहीत.

सारा तेंडुलकर की सारा अली खान

एके वेळ अशी होती जिथे शुभमन गिलचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्यासोबत जोडलं जातं होतं. मात्र त्यानंतर अशी बातमी समोर आली की, दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं आहे. मात्र सारा नंतर आणखी एक सारा म्हणजेच सारा अली खानची एंट्री झाली. सारा अली खानला अनेकदा डिनर आणि पार्टीमध्ये एकत्र स्पॉट केलं होतं.

सचिनच नाव ऐकताच  Shubman Gill गिल लाजला

शुभमनच नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं. सारा आणि शुभमन यांचं अफेअर असल्याची कथित चर्चा आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार, सारा आणि गिल यांच्यात प्रेम संबंध आहेत. मात्र अजून याची अधिकृतरित्या कोणीही घोषणा केली नाही.

अशातच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शुभमन बसमध्ये बसलेला दिसतोय. यावेळी बसच्या खिडकीतून तो चाहत्यांना हात मिळवतोय. इतक्यात एक चाहता त्याला म्हणतो, की सचिनची काळजी घ्या. यावेळी त्याला साराच्या वडिलांच्या नावावरून चिडवण्यात आलं. यानंतर शुभमन गिल लाजला आणि खिडकी बंद केली. 

गिलने मोडला विराटचा रेकॉर्ड

गिलने पहिल्या सामन्यात 212 धावा केल्या होत्या, तर या सामन्यातही शतक झळकावलंय. यासह त्यानं या मालिकेत आत्तापर्यंत 360 धावा केल्यात. तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम (Most runs in a bilateral series) याआधी बाबर आझमच्या (Babar Azam) नावावर होता, ज्यानं 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 360 धावा केल्या होत्या, तर शुभमन गिलनेही तेवढ्याच धावा केल्या आहेत. या मालिकेत बाबरच्या विक्रमाची बरोबरी झाली आहे. तर विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम त्याने मोडीस काढलाय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *