Headlines

Sara Ali Khan : कोण होत्या उषा मेहता? ज्यांच्या नुसत्या आवाजानेच ब्रिटीश थरथर कापायचे,जाणून घ्या

[ad_1]

Who is Usha Mehta : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) ‘ऐ वतन मेरे वतन’ (Ae Watan Mere Watan)चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे.या टीझरची एकच चर्चा आहे. कारण या चित्रपटामध्ये सारा अली खान प्रथमच एका महिला स्वातंत्र्य सेनानीची (Freedom Fighter) भूमिका साकारणार आहे. या महिला स्वातंत्र्या सेनानीचे नाव उषा मेहता (Usha Mehta) होते. या उषा मेहता कोण आहेत? तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका काय होती? हे जाणून घेऊयात. 

टीझरमध्ये काय? 

‘ऐ वतन मेरे वतन’ (Ae Watan Mere Watan) या चित्रपटात सारा अली खान (Sara Ali Khan) भारताची महिला स्वातंत्र्य सेनानी उषा मेहता (Freedom Fighter Usha Mehta) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आज प्राइम व्हिडीओच्या युट्यूब अकाऊंटवरून साराच्या ‘ऐ वतन मेरे वतन’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये तुम्ही पाहू शकता की सारा एका रुममध्ये स्वत: ला बंद करून घेते आणि बोलते ‘अंग्रेजों को लग रहा है कि उन्होंने क्विट इंडिया का सिर कुचल दिया है. लेकिन आजाद आवाजें कैद नहीं होती. ये है हिंदुस्तान की आवाज है, हिंदुस्तान में कहीं से, कहीं पे हिंदुस्तान में.’ त्यानंतर अचानक दरवाजावर कोणी तरी जोर जोरात ठोठावतं. हे पाहून सारा घाबरते हे आपण टीझरमध्ये पाहिले असेलच. या टीझरची बॉलिवूडमध्ये एकच चर्चा आहे.साराचा हा आगामी चित्रपट अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

 

हे ही वाचा : ‘ये है हिंदुस्तान की आवाज…’, Sara Ali Khan च्या Ae Watan Mere Watan चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

 

कोण होत्या उषा मेहता?

सारा अली खानच्या (Sara Ali Khan) या चित्रपटाचा टीझर पाहून अनेकांना उत्सुकता लागली होती की, या उषा मेहता आहेत तरी कोण? स्वातंत्र्य लढ्यात त्यांची भूमिका काय होती? तर उषा मेहता (Usha Mehta) या महिला स्वातंत्र्य सेनानी होत्या. त्या स्वातंत्र्यलढ्यात गुप्त रेडिओ ऑपरेटर होत्या. उषा मेहता यांनी त्यांच्या आवाजानेच ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होतं. तसेच त्यांनी त्यांच्या आवाजानेच ब्रिटिशांविरुद्ध क्रांती घडवली होती. 

उषा मेहता (Usha Mehta)यांनी ‘काँग्रेस रेडिओ’ ही गुप्त रेडिओ सेवा सुरू केली होती. ही रेडिओ सेवा त्या काळी खूप फायदेशीर ठरली होती. कारण या रेडिओ सेवेच्या माध्यमातून सर्व बातम्या आणि माहिती शेअर केली जात होती.ज्यावर तत्कालीन ब्रिटिशांनी बंदी घातली होती.

तरुंगवासही भोगावा लागलं

उषा मेहता (Usha Mehta) यांचा जन्म 25 मार्च रोजी सुरतमधील एका गावात झाला होता. तर वयाच्या पाचव्या वर्षी त्यांची महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली. त्यावेळी महात्मा गांधींनी उषा मेहता यांच्या गावाजवळ छावणी उभारली होती, त्यावेळी त्यांनी बापूंना तिथून जवळून पाहिले होते. बापूंची भेट झाल्यानंतर त्यांनी खादी परिधान करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. 

उषा मेहता (Usha Mehta) यांना स्वातंत्र्यलढ्यात गुप्त रेडिओ चालवल्याबद्दल 4 वर्षांचा कारावासही भोगावा लागला होता. 1946 मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. भारत सरकारने उषा मेहता यांना पद्मविभूषण देऊन गौरव केला होता. 11 ऑगस्ट 2000 रोजी उषा मेहता यांचे निधन झाले होते.

दरम्यान याच भारतीय महिला स्वातंत्र्य सेनानीची जीवन कहानी आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या उषा मेहता यांची भूमिका सारा अली खान (Sara Ali Khan)चित्रपटात साकारणार आहे. उषा मेहता (Usha Mehta) यांची ही जीवन कहानी मोठ्या पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *