Headlines

Sankashti Chaturthi Upay: संकष्टी चतुर्थीला करा ‘हे’ उपाय, तुम्हालाही मिळतील गणपती बाप्पाचे आशीर्वाद!

[ad_1]

Sankashti Chaturthi: फेब्रुवारी महिन्यात (February) दुसऱ्या गुरूवारी येणाऱ्या म्हणजेच 9 फेब्रुवारी 2023 रोजी संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) येत आहे. तसं ज्योतिषीय कॅलेंडरनुसार पाहता, चतुर्थीला शास्त्रात रिक्त तिथी मानून अशुभ म्हटलंय. पण गणेशाची (Ganpati) पूजा केल्यानं त्याचा अशुभ प्रभाव पूर्णपणे नाहीसा होतो, असं मानलं जातंय. या दिवशी काही खास उपाय करणं गरजेचं असतं. (sankashti chaturthi upay zodiac signs ganesh chaturthi astro tips in marathi)

ज्योतिषीय कॅलेंडरनुसार (Astrological Calendar) एका वर्षात एकूण 24 चतुर्थी असतात. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. ही तिथी गजानन गणपतीला (Gajanan Ganapati) समर्पित करण्यात आली आहे. त्यामुळे या दिवशी गणेशाची पूजा (Worship of Ganesha) केली जाते. गणपतीची आराध्या केली जाते.

अशी करा गणपती बाप्पाची पूजा (ganesh chaturthi astro tips)

सकाळी लवकर उठल्यावर स्वच्छ अंघोळ करून घ्या, त्यामुळे तुम्हालाही फ्रेश वाटेल. चांगले स्वच्छ कपडे घालून मंदिरात जा. गणपतीला अभिषेक करा. त्यांना लाल वस्त्र, हिबिस्कस फूल किंवा इतर लाल रंगाचे फूल, हार, लाल चंदनाचा टिळक, मोली, जनेयू, सुपारी, सुपारी इत्यादी अर्पण करा आणि डोळे मिटून 5 मिनिट चिंतन करा.

आणखी वाचा – Navpancham Rajyog: नवपंचम राजयोग ‘या’ लोकांना बनवणार कोट्याधीश, गुरु आणि चंद्र चमकवणार नशीब!

संकष्टीला करा हे उपाय  (sankashti chaturthi upay)

आजच्या दिवशी उपवास करणं आरोग्यासाठी गरजेचं असतंय. आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार दानधर्म करावा. चतुर्थीच्या दिवशी दुर्वा आणि हळदीच्या 11 गुंठ्या पिवळ्या कपड्यात बांधून घरातील मंदिरात ठेवाव्यात. आता पुढील 10 दिवस अखंड पूजा करा. आता ही पोतली घराच्या किंवा दुकानाच्या तिजोरीत ठेवा. यातून पैसा येऊ लागतो.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पंचामृताने अभिषेक करावा. गणपती बाप्पाला सजवून त्यांना वस्त्र, फुले, हार, सुपारी, सुपारी, जनेयू इत्यादी अर्पण करावं. त्यांना लाडू अर्पण करा, हा उपाय केल्यानं भक्तांचे सर्व दुःख दूर होतात, असं मानलं जातं.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *