Headlines

Sanju Samson | मुंबई विरुद्धच्या सामन्यात संजू समॅसनचा ‘द्विशतकी’ तडाखा

[ad_1]

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) नववा सामना हा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) यांच्यात खेळवण्यात येत आहे. मुंबईने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. राजस्थानचा कॅप्टन संजू समॅसनने (Sanju Samson) या टॉससाठी मैदानात पाऊल ठेवताच मोठा कीर्तिमान केला आहे. संजूने अनोखं द्विशतक पूर्ण केलंय. (ipl 2022 mi vs rr rajsthan royals captain sanju samson playing 200th t 20 match against mumbai indians)

संजूचा टी 20 कारकिर्दीतील हा एकूण 200 वा सामना ठरलाय. संजूने आतापर्यंत एकूण 199 टी 20 सामने खेळले आहेत. संजूने या 199 टी 20 सामन्यांमध्ये 131 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 889 धावा केल्या आहेत. यात 3 शतकं आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. संजूने ही तिन्ही शतकं आयपीएलमध्ये केली आहेत. संजूने आयपीएलच्या 122 सामन्यांमध्ये 3 हजार 123 धावा केल्या आहेत. 

संजू सर्वाधिक आयपीएल सामने खेळणाऱ्यांच्या यादीत 30 व्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 222 आयपीएल सामन्यांसह अव्वल स्थानी विराजमान आहे.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थम्पी. 

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन :  जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू समॅसन (कॅप्टन/विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेन्ट बोल्ट आणि युजवेंद्र चहल. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *