संजय राऊतांच्या जामीनावर मुख्यमंत्र्यांनी थेट भाष्य टाळलं, म्हणाले, “यावर आता…”CM Eknath Shinde avoided to comment on Sanjay Raut Bail in Patra Chawl caseशिवसेना खासदार संजय राऊत यांना तब्बल १०३ दिवसांनी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात त्यांनी ईडीने अटक केली होती. बुधवारी रात्री न्यायालयीन कोठडीतून सुटका होताच त्यांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. त्यांच्या जामीनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट भाष्य करणं टाळलं आहे. राऊतांच्या जामिनाबाबत प्रवक्ते बोलतील, असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

“ही देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक, आता त्यांना कळेल…” सुटकेनंतर संजय राऊतांचा थेट इशारा, म्हणाले…

तुरुंगातून बाहेर येताच संजय राऊतांनी मोठं विधान केलं आहे. “मला अटक करून त्यांनी खूप मोठी चूक केली आहे. ही देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक असेल”, असं राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, राऊतांनी काही गंभीर आरोपदेखील केले आहेत. “माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले होते. उसको अंदर डालो, तभी हमारी सरकार आ जाएगी, असे आदेश देण्यात आले होते, हे मला माहीत होतं. महाराष्ट्रातले बोके आता खोक्यावर बसले आहेत. गद्दारांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. आपल्या हातातून मुंबई काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली. पण ते होणार नाही”, असे राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांच्या अटकेचे आदेश दिल्लीतून दिले? तुरुंगातून बाहेर येताच स्वत:च केला मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, संजय राऊतांना बेकायदा अटक झाल्याचं स्पष्ट मत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी १२२ पानी निकालपत्रात नमूद केले आहे. अटकेची कारवाई शिताफीने करणारी ईडी खटले मात्र संथ गतीने चालवते अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराऐवजी केवळ दिवाणी वादाचे असताना संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना विनाकरण अटक करण्यात आली, असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.Source link

Leave a Reply