Headlines

संजय राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरेंचा ‘दैनिक सामना’ संदर्भात मोठा निर्णय | Shivsena Chief Uddhav Thackeray Becomes Saamana Editor scsg 91

[ad_1]

शिवसेनेचं मुखपत्र अशी ओळख असणाऱ्या ‘दैनिक सामना’मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या या वृत्तपत्राची धुरा पुन्हा एकदा शिवसेनेचा प्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या हाती घेतलीय. मागील आठवड्यामध्ये संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर आता सामनाची जबाबदारी उद्धव यांनी स्वत:कडे घेतलीय. वृत्तपत्राच्या प्रिंट लाइनमध्ये आज उद्धव ठाकरेंचं नाव संपादक म्हणून छापण्यात आलं आहे.

नक्की पाहा >> Thackeray vs Shinde: फडणवीसांऐवजी शिंदेंना CM बनवण्यामागील कायदेशीर कारण आलं समोर; असा आहे BJP चा मास्टर प्लॅन

महाराष्ट्रामध्ये २०१९ साली झालेल्या सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता. मार्च २०२० मध्ये उद्धव यांनी हे पद त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवलं होतं. मात्र आता सत्तेतून पायउतार झाल्यानंतर महिन्याभरानंतर उद्धव यांनी पुन्हा एकदा ही जबाबदारी आपल्या खांत्यावर घेतली आहे. वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत असतील.

नक्की पाहा >> Photos: अज्ञात व्यक्तीच्या खात्यावर पत्नीने पाठवलेले १ कोटी ८ लाख, ३ सवलती अन् न्यायालयाबाहेर संजय राऊतांची ‘ती’ बाचाबाची

उद्धव यांनी सामनाचा कारभार हाती घेतल्यानंतर आता ते वृत्तपत्राच्या माध्यमातून शिंदे सरकारला लक्ष्य करणार का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. संजय राऊत यांना अटक करण्यात आल्यानंतर वृत्तपत्रातील अग्रलेख आणि रोखठोक सारख्या सदरांसंदर्भात चर्चांना सुरुवात झाली होती.

संजय राऊत यांनी न्यायालयाकडे अग्रलेख लिहिण्यासंदर्भात परवानगीही मागितली होती. मात्र ती परवानगी नाकारण्यात आली. याच साऱ्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी वृत्तपत्राची धुरा हाती घेतल्याचे समजते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *