Headlines

संजय राऊतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला, भाऊ सुनिल राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | Sunil Raut first comment on increase in ED custody of brother Sanjay Raut pbs 91

[ad_1]

मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडी कोठडीत असणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांची अडचण वाढली आहे. सेशन कोर्टाने त्यांना पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राऊतांना आता सोमवारपर्यंत (८ ऑगस्ट) ईडी कोठडीत राहावं लागेल. न्यायालयाच्या या निर्णयावर राऊतांचे भाऊ सुनिल राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच संजय राऊतांना सोमवारपर्यंत जामीन मिळेल, अशी आशा व्यक्त केली. ते गुरुवारी (४ ऑगस्ट) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

सुनिल राऊत म्हणाले, “आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायालयाने आज पुन्हा संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी दिली आहे. आम्ही काही कागदपत्रे आयकर विभागाला दाखवली होती. संजय राऊत यांनी राज्यसभेच्या प्रतिज्ञापत्रातही ही कागदपत्रे दाखवली होती. अशा सर्व कागदपत्रांचा संबंध प्रविण राऊत यांच्याशी जोडण्याचा चुकीचा व खोटा प्रयत्न ईडी गेले दोन दिवस करत आहेत.”

हेही वाचा : संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला, कोर्टाने ८ ऑगस्टपर्यंत सुनावली कोठडी

“ईडी हेच कागदपत्रे न्यायालयात सादर करून न्यायालयाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे ईडीला संपूर्ण सहकार्य करू. संजय राऊत यांना सोमवारपर्यंत ईडी कोठडी दिली आहे. आम्ही त्याची वाट पाहू. सोमवारी आम्हाला जामीन मिळेल हा विश्वास आहे,” असंही सुनिल राऊत यांनी सांगितलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *