संजय मांजरेकरने पुन्हा एकदा Ravindra jadeja ला डिवचलं


मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) आणि टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा  (Ravindra jadeja)  यांच्यातला वाद काही जुना नाही आहे. कारण अनेकदा मांजरेकरने रविंद्र जडेजाच्या खेळावरून लक्ष्य केलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा संजय मांजरेकरने रविंद्र जडेजा संदर्भात मोठं विधान केलं आहे.या त्याच्या विधानावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

टीम इंडियात आपली जागा वाचवण्यासाठी आणि हार्दिक पांड्या (hardik pandya) आणि दिनेश कार्तिकपेक्षा (dinesh kartik) चांगला खेळाडू असल्याचे रवींद्र जडेजाला  (Ravindra jadeja)  निवडकर्त्यांसमोर स्वत:ला सिद्ध करावे लागेल असे संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) याने म्हटलेय. तसेच रवींद्र जडेजाला हे देखील माहिती असेलचं 2022 च्या टी20 विश्वचषकातील त्याचे स्थान टीम इंडियामध्ये निश्चित झालेले नाही, असे देखील संजय मांजरेकर यांनी म्हटलेय. 

काय म्हणाले संजय मांजरेकर?
संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) स्पोर्ट्स 18 च्या शो ‘स्पोर्ट्स ओव्हर द टॉप’ मध्ये बोलत होते. यावेळी बोलताना मांजरेकर म्हणाले,  ‘जर रवींद्र जडेजा  (Ravindra jadeja) टीम इंडियामध्ये अष्टपैलू फलंदाज म्हणून खेळत असेल तर त्याला सिद्ध करावे लागेल की तो दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्यापेक्षा 6 किंवा 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. 

गेल्या काही वर्षांत अक्षर पटेलने रवींद्र जडेजापेक्षा  (Ravindra jadeja) चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे जर रवींद्र जडेजा टीम इंडियामध्ये अष्टपैलू म्हणून खेळत असेल, तर तो अक्षर पटेलपेक्षा चांगला फिरकी गोलंदाज असल्याचे त्याला संघ व्यवस्थापनाला सिद्ध करावे लागेल, असे संजय माजरेकर म्हणालाय.  ‘आता प्रश्न पडतो की टीम इंडियात रवींद्र जडेजा बॉलर ऑलराऊंडर म्हणून खेळणार की बॅट्समन ऑलराऊंडर म्हणून ? असा सवाल संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी उपस्थित केलाय. 

जडेजा-मांजरेकर यांच्यातलं जुन वाकयुद्ध
संजय मांजरेकर वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान वादात सापडले होते. मांजरेकरांनी रविंद्र जडेजावर  (Ravindra jadeja)  ट्विटरद्वारे टीका केली होती. यानंतर खऱ्या अर्थाने जडेजा-मांजरेकर यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळालं. रविंद्र जडेजा हा ‘बिट्स ऍण्ड पिसेस’ खेळाडू असल्याचं संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) म्हणाले होते.

युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये खराब कामगिरी केली. यानंतर एका स्पिनरला काढून जडेजाला संधी द्यावी का, असा प्रश्न मांजरेकर यांना विचारण्यात आला होता. तेव्हा ‘मी थोडी बॅटिंग आणि थोडी बॉलिंग करु शकणाऱ्या जडेजासारख्या  (Ravindra jadeja)  खेळाडूंचा चाहता नाही. असं त्यांनी म्हटलं होतं. जडेजा हा सध्या त्याच्या 50 ओव्हरच्या कारकिर्दीमध्ये असा खेळाडू आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र तो पूर्ण बॉलर आहे. 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये मी टीममध्ये बॅट्समन आणि स्पिनरना संधी देईन’, असं मांजरेकर (Sanjay Manjrekar) म्हणाले होते.

संजय मांजरेकरच्या (Sanjay Manjrekar) या टीकेला रविंद्र जडेजाने  (Ravindra jadeja) प्रत्युतर दिले. ‘मी तुझ्यापेक्षा दुप्पट मॅच जास्त खेळलो आहे, आणि अजूनही खेळत आहे. ज्यांनी काही साध्य केलं आहे. त्यांचा आदर करायला शिका. तुझी वाचाळ बडबड खूप ऐकली’, असं ट्विट जडेजाने केलं होतं.Source link

Leave a Reply